या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अबोध भीतीचं त्यांना आतापर्यंत न उमगलेलं कारण हेच तर नाही? । नंदिताच्याही मनावरचा ताण नेहाच्या प्रतिपादनानं उजागर होत तिच्या चेह-यावर प्रतिबिंबित झाला होता. आपण विवेकला प्रमाण मानीत पोलीस केस करायचं धाडस केलं खरं, पण त्याची किंमत प्रशासकीय कार्यवाही, कदाचित निलंबनानं तर मोजावी लागणार नाही? पतीच्या माघारी सिंगल पॅरेंटचा रोल निभावीत आपण दोन किशोरवयीन मुलं वाढवत आहोत. त्यांच्यासाठी मला नोकरी आवश्यक आहे. पण ती पणाला लागली तर नाही? । “मी एक जाहीर करू इच्छितो. नामदेव म्हणाला, “मी स्वप्न पाहिलं होतं, सनदी अधिकारी होऊन इथल्या विकासकामांमध्ये प्रशासनामार्फत योगदान देण्याचं. पण हे अधिकारी आज क्षुद्र कीटक बनले आहेत. जळवा बनलेत जळवा. त्यांना राजकारण्यांच्या तालावर नाचावं लागतं, नाही तर बदली व कार्यवाहीचं ब्रह्मास्त्र वापरून नामोहरम करीत त्याचा पार खुळखुळा केला जातो. हे नंदिता मॅडमच्या आजच्या झालेल्या तडकाफडकी बदलीनं सिद्ध होतं. म्हणून मी प्रशासक होण्याच स्वप्न सोडून देत आहे.. मी इकॉनॉमिस्ट आहे. प्रयत्न केला तर मला प्रायव्हेट बँकींग, इन्शुरन्स वा एम. एन. सी. मध्ये सहज जॉब मिळेल. नव्हे. यापूर्वी मिळालेला जाब नाकारून एम. पी. एस. सी., यू. पी. एस. सी. करिता मी तीन वर्षे वाया घालवली. या देशाला, या राज्याला चांगले ध्येयवादी व प्रामाणिक प्रशासक नको आहोत. तर मग आम्ही स्वत:ला त्यासाठी का पणाला लावायचं? मी प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी पत्करून सुखासीन, आत्मकेंद्री आयुष्य जगू शकतो. तेही आम आदमीच्या शोषणावर जगणं असणार आहे. बट आय हॅव नो अल्टरनेटिव्ह!” “पण मी नामदेवइतका हताश नाही. माझ्यात अजूनही व्यवस्थेच्या विरोधात लढायची खुमखुमी आहे.” सिद्धार्थ म्हणाला, “मी खराखुरा भीमसैनिक आहे. 'जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव' यावर माझा विश्वास आहे. मी बंडखोर दलित साहित्यावर व भीम विचारांवर पोसलेला तरुण आहे. मी असा हताश होणार नाही. मी लढाई अर्धवट सोडणार नाही, पण गीअर बदलणार आहे.' म्हणजे काय? जरा विस्तारानं सांगा ना! शुअर, किंचित हसत सिद्धार्थ म्हणाला, “आजवर नामदेव व नेहाप्रमाण अधिकारी होऊन चांगलं प्रशासन देत भारत देश आणि हा आपला महाराष्ट्र प्रगतिपथावर नेण्यात आपलाही सहभाग असावा असं माझं प्रामाणिक मत होतं अन् तसं स्वप्नही होतं. ते आता संपल्यातच जमा आहे. पण मी लढणार आहे. ही सिस्टिम बदलायचा असेल तर राजकीय ताकद हवी. म्हणजे तुम्ही राजकारणात प्रवेश करणार? होय! तिथं ताकद कमावून सिस्टिम बदलण्याचा प्रयत्न करणार. साध्या १४८ । लक्षदीप