या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११. भव शून्य नादे ‘‘शिवशंभो हर हर - शिवशंभो!” काल दुपारी तामुलवाडीला आल्यानंतर जो धुंवाधार पाऊस सुरू झाला, तो रात्रभर चाबकाच्या फटकाच्याप्रमाणे वाडीवर आसूड ओढीत होता! साथीला सू सू असा भयप्रद, जीव लकलक करणारा आवाज करीत वारा वेगवान वाहत होता. त्यामुळे वळायला आलेली अनेक बाभळी - लिंबांची झाडे कडाकडा आवाज करीत कोसळत होती. तर तामुलवाडीच्या तिन्ही बाजूंनी दुथडी भरून वाहणा-या ओढ्यात फोफावलेला बांबूची लवचीक वने वाकत सुसाट्याचा वारा झेलत होती आणि त्यांच्या छिद्रातून मंजुळ मुरलीच्या नादाऐवजी रुद्र वादळी संगीत प्रसवत होतं.... अवघी वाडी, एक पाटलाचा वाडा सोडला तर, झोपड्यांची किंवा कच्च्या अर्धपक्क्या घरांची हेती... घरंही दगड-मातीनं बांधलली व छत म्हणून पत्रे असलेला - ज्यांच्या आधारासाठी मोठमोठे दगड ठेवलेले! ते भिरकावून देत तुफान वारा पत्रही उडवीत अनेक घरं उघडी पाडीत होता... | निसर्गाचं ते प्रलयंकारी तांडव जीवन मुठीत धरून पाहात - अनुभवत अवघ्या वाडीची समस्त माणसे - बायका - मुले, होत्या-नव्हत्या त्या सोलापूर चादरी, कांबळे आणि तेही नसेल तर चिरगूट पांघरून स्वत:चा त्या तुफानी वादळी पावसापासून बचाव करीत चिडीचिप्प झोपली होती. दक्षिणेला पूर्णा नदीच्या काठावर हेमाडपंथी बांधणी असलेल्या महादेवाच्या चिरेबंदी देवळात रात्री अक्षयच्या साथीला धुनी लावून बसलेला व तुफानी पावसाचा पर्वा न करता नामस्मरणात मग्न असलेला मोरया गोसावी होता! अक्षयसाठी एक लाकडी बाज देवळात आणून टाकली होती व मास्तरांनी दिलेली राठ, टोचणारी पण उबदार घोंगडी गळ्यापर्यंत पांघरून अक्षय पहुडला होता! | समोर दोन - तीनशे मीटरवर पूर्णा नदी पुराचं लालजर्द पाणी घुसळीत वाढत्या सामथ्र्यानिशी वाहत होती. तिचा तो वादळी - प्रपाती नाद कानात रात्रभर घोंगावत होता! नजर जाईल तिथवरचं विश्व विजेअभावी गडद अंधारलेलं. देवळाच्या गाभा-या १५२ । लक्षदीप