या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकाच खोलीतला भीषण अभावाचा संसार... कोप-यात बाजेवर ती पोरसवदा पोर करुण किंकाळ्या फोडीत आक्रंदत होती. एक अनुभवी सुईण पोटावरून हात फिरवीत कळ जिरवत होती. ती वाढवणं धोकादायक होतं. अक्षय क्षणभरच त्या घरात डोकावला... आणि लगेच बाहेर पडला. असं या विज्ञानयुगात पाहावं लागेल. हे त्याच्यासाठी अविश्वसनीय होतं. | सखल भागातली अवघी झोपडपट्टी रात्रभर पाण्याखाली होती. आता कुठे पाणी ओसरल्यामुळे ते गोरगरीब जीव, जे रात्रभर शाळेत आस-याला होते, परत आले होते व आपला पाण्यात उद्ध्वस्त झालेला संसार पाहात होते. पाण्याच्या वेगानं लवचीक बांबूपासून बनलेल्या झोपड्या तगून होत्या; पण भांडीकुंडी, धान्य - पीठ व इतर सामान पार धुऊन निघालं होतं. अंगावरील वस्त्राखेरीज कपडे उरले नव्हते... काहींच्या बकन्या - कोंबड्याही वाहून गेल्या होत्या. खिशात पैका नव्हता. गावात आलेले रॉकेल मागेच संपलं होतं. या गावचं रेशन दुकान दुकानदारानं सहा महिने माल उचलला नाही म्हणून रद्द करून ते नदीपल्याड गावाला जोडलं होतं. तिथं गेल्याखेरीज चूल पेटायला पण रॉकेल मिळायचं नाही. पावसानं लाकूड-फाटा, काटक्या-कुटक्याही ओल्या सर्द झाल्यामुळे पेटत नव्हत्या. भकास नजरेनं टळाटळा नदीच्या पुराकड पाहात बसलेल्या स्त्रिया - दरवर्षीच्या अशा उद्ध्वस्त होण्यामुळे बनलेल्या दैववादी वृत्तीमुळे निर्विकारतेचे चेह-यावर चढलेले लेप, पण केवढे बोचक, टोचणी लावणार. उघडी, उकिडवी बसलेली पुरुष मंडळी, हलक्या स्वरात कुजबुजणारी - पोटाचा, रोजगाराची व संसाराची चिंता त्यातून प्रकट होत होती. उघडीनागडी पोरं मात्र तहान भूक विसरून पुराचं पाणी पाहात खिदळत होती. जीवनाची आशा, जगण्याची उमेद वाढविणारी ती प्रकाशकिरणे वाटली अक्षयला. त्याला त्यांच्यात मोर गोसावाचा नि:संग छबी दिसली. सरपंच अक्षयला सांगत होता, “सायेब, चहुबाजूंनी पाणी असल्यामुळे गावच्या मातीखाली पाझर झिरपून सदैव ओल आणतो... आमची घरं - कितीही पक्का पाया रचला तरी धा-पाच वर्षांत ढासळतात; कारण खालची जमीन दलदल झालीय... | काही ठिकाणी त्यानं पहारीनं खणायला लावलं, तेव्हा एका झटक्यात पहार जमिनीच्या आत सहजतेनं गेली होती! अक्षयला त्या क्षणी त्या गावाची वषविषा। कणाकणानं येणारी मृत्यूची चाहूल जाणवली आणि त्याच्या मनात काही विचार पक्क होत गेले! ‘हिस्स-' असा आवाज झाला. अक्षय सरपंचाशी बोलण्याच्या नादामध्ये जा असताना त्या आवाजानं भानावर आला. समोर एक हिरवागर्द साप सळसळत होता. मानवी चाहलीनं त्यानं आवाज केला होता. अक्षय तो निघून जाईपर्यंत थबकला होता ‘साहेब, पाऊस सुरू झाला की तामुलवाडीला साप-विंचवाचा हा असा त्रास १५८ ॥ लक्षदीप