या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फोल ठरतं आणि या पूर्णा नदी व तीन ओढ्यांनी जगापासून अलग केलेल्या तामुलवाडीत तरी ते अप्रस्तुत ठरतात!
 तो किती वेळ तरी आपल्याच विचारात नादावला होता. अचानक भान आलं ते मोरया गोसावीनं समाधी सोडीत त्याला दिलेल्या हाकेनं. “बाळ, आपल्याला गावात जायचं आहे." दोन रात्री व तिस-या दिवशी जवळजवळ असूनही तो अक्षयशी एक शब्दही बोलला नव्हता. आजची त्याची हाक त्याला त्यामुळे क्षणभर अविश्वसनीय वाटली.
 “चला महाराज." तो उठत म्हणाला.
 मोरया गोसावीचे दाढी-मिशीच्या जंजाळात हरवलेले ओठ किंचित हलले होते. जणू त्यानं स्मित केलं होतं, उवदार व स्नेहल, कारण त्याच्या डोळ्यांत त्याच्या छटा अक्षयला जाणवल्या.
 कदाचित-कदाचित आज आपण दोन दिवस वाडीच्या लोकांच्या जीवनमरणाचा शोध घेत आहोत, तो कदाचित सफल होईल...
 पण-पण ते कळून तरी काय फायदा? हा सवाल त्याला फटकारून गेला, तरीही मनात त्याची जिज्ञासा होती. त्या ओढीत तो मोरया गोसावींसोबत चालू लागला.
 काही क्षणातच मोरया गोसावी एका झोपडीत शिरला. त्याच्या मागोमाग अक्षयही. तेथे एका मोडक्या खाटेवर त्या घराचा तरणाबांड गडी वेदना असह्य होत असल्यामुळे किंचाळत होता. सारं अंग काळेनिळं पडलं होतं. त्याला सर्पदंश तर झाला नाही? अक्षयच्या मनात शंका आली आणि ती खरी असल्याची ग्वाही त्या गड्याच्या म्हातारीनं दिली -
 “आज रामपारी झाड्याला जाताना पोराचा पाय एका सापावर पडला आणि त्यानं चावा घेतला..."
 ओ माय गॉड... किती वेळ गेला बहुमोल असा. या काळात त्याला तातडीनं दवाखान्यात हलवलं असतं तर तो वाचला असता. आता तो मृत्यूच्या दारी आहे. कदाचित आपल्यासमोरच... अक्षयला आपल्या आजीचा मृतदेह आठवला आणि मृत्यूच्या जाणिवेनं काळीज थरकापलं.

 तरीही काहीतरी केलं पाहिजे, असे त्याला वाटत होतं! त्यानं खिसा चाचपला, त्याचा दाढीचा छोटासा किट खिशात होता, त्यातलं त्यानं रेझर काढलं वे जेथे सर्पदंश शाला तथं तो ठेवून कातडी कापली व वरच्या पिंढया गच्च धरल्या. मोरया गोसावी अचल व निस्संगपणे त्याची कृती पाहात होता. त्यानं मदतही केली नाही की विरोधही कला नाही. अक्षयच्या त्या कृतीचा काही उपयोग झाला नाही. कारण फिकटं रक्त हर येत होतं, मंदपणे, म्हणजेच त्याच्या जगण्याच्या यंत्रण मंदावत होत्या. तो नि:संशय मरणाच्या दाराशी होता.

लक्षदीप । १६१