या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण श्रीकांतने तुला नाकारणे हा धक्का एवढा जबर होता की तुला एम. डी. पी.चा झटका आला. पण तू एक कणखर स्त्री आहेस, तुझ्यातलं फायटिंग स्पिरिट जबर आहे. म्हणून तू इतक्या लवकर माझ्या उपचारांना प्रतिसाद दिलास."
 डॉक्टरांनी उपचाराचा एक भाग म्हणून कमलला तटस्थतेने विचार करायला व आपल्या भावनांची चिरफाड करायला शिकवलं होतं. आताही ती पडल्या पडल्या स्वत:ला तपासून पाहात होती.
 आईची मी जीव की प्राण. बाबांना मी घरी नजरेसमोर क्षणभरही दिसले नाही की चैन पडत नसे आणि संदीपभय्या तर मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचा. असे वोस उन्हाळे, पावसाळे फुलांनी घातलेल्या पायघड्यावरून चालताना अत्तराच्या फायाप्रमाणे गोड सुगंध मागे ठेवीत उडून गेले. आणि ‘कन्या हे परक्याचे धन' ही जाणीव बाबांना झाली. कमलसाठी वरसंशोधन त्यांनी आरंभलं. तीही गोड भावविश्वात रमत होती. त्या काळातलं तिचं गुणगुणायचं गाणं होतं, “परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, भाव दाटले मनी अनामिक, साद तयांना देशील का?”
 आणि पहिला नकार पचवणं कमलला फारच जड गेलं. का त्यानं आधी पसंती देऊन नाकारलं? रूप, सौंदर्य, शिक्षण, झालंच तर सुरेल आवाज, काय कमी होतं माझ्यात? हा प्रश्न तिला सतावत होता. त्यानंतरही दोन - तीन वेळा असंच घडलं, तेव्हा ती आईच्या गळी पडत रडत म्हणाली,
 “आई, मला यापुढे दाखवून नाही घ्यायचं. भले माझं लग्न नाही झालं तरी हरकत नाही. मला नकार नाही सहन होतं.”
 “जाऊ दे बेटा, ते सारे तुला नाकारणारे गाजरपारखी होते, त्यांना अस्सल माणिक मोती कळत नाहीत." तिची समजूत घालत आई म्हणाली होती.
 तेव्हा गंभीर होत बाबा म्हणाले, "अशी किती समजूत घालणार आहेस? एकदा तिलाही कळलंच पाहिजे."
 संदीपभय्या तिथंच वाचीत बसला होता, तो म्हणाल, “नो, नो बाबा...."
 नाही बेटा” बाबा म्हणाले, “मलाही सांगताना फार वेदना होतात. मीही हे विसरून गेलो होतो. पण लग्नाच्या वेळी सारं सांगायला हवं म्हणून प्रत्येक स्थळाला सांगितलं. वाटलं होतं. ते मन मोठं करून हे न्यून - ते खरं तर न्यून नाही, म्हणून स्वीकारतील. पण खरंच, आपला समाज किती बुरसटलेला आहे, शी..."
 कमले भयचकित झाली होती. बाबांचा तो गंभीर स्वर तिच्या काळजाचं पाणी णा करून गेला होता. काहीतरी त्यांना आपल्याला लागोपाठ आलेल्या नकाराच्या दिभात सांगायचे आहे. पण ते काहीतरी भयंकर, असह्य असं आहे. म्हणून त्यांचा स्वर व्याकूळ झालेला आहे.

 "मला तिची अवस्था पाहावत नाही संदीप, काय कमी आहे तिच्यात? रूप,

लक्षदीप । १७१