या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 व्हॅटिकन सिटीला जाण्यापूर्वी पपांसमवेत मी जंगलात शिकारीला गेलो होतो. माझ्या हातानं गोळी झाडून एका मस्तवाल रानडुकराची शिकार केली होती. त्यावेळी मी प्रथमच मृत्यूला सामोरं गेलो होतो. माझं वय अवघं सोळा वर्षाचं होतं. त्या कोवळ्या वयात जीवन-मरणाच्या त्या रौद्र दर्शनानं मी थरारून गेलो होतो. कितीतरी दिवस तो अनुभव मला अस्वस्थ करीत होता. त्याला एके दुपारी अवचित वाट मिळाली, ती लिखाणातून! कोणती अज्ञात नियती माझं बोट पकडून माझ्याकडून एका अनाम प्रेरणेनं व प्रबळ ओढीनं लिहून घेत होती, ते मला कळत नव्हतं. आजही एवढंच लक्षात आहे की, मी एका झपाटलेल्या अवस्थेत अडीच-तीन तास पांढ-यावर काळे करीत होतो. त्या भावविभोर अवस्थेतून बाहेर आल्यावर लिहिलेलं वाचून पाहिलं. माझा मीच स्तिमित होऊन गेलो होतो. माझ्या त्या कथेनं मीच झपाटून गेलो. एका अनोख्या निर्मितीच्या आनंदानं थरारून गेलो.
 ती कथा पपांनी एका एजंटामार्फत लंडनच्या एका प्रसिद्ध साहित्यिक मासिकाला पाठवली. मी नंतर ते विसरूनही गेलो. पण व्हॅटिकन सिटीमध्ये धार्मिक शिक्षण घेत असताना ती कथा छापलेला त्या मासिकाचा अंक ‘रिडायरेक्ट' होऊन हाती पडला. माझी प्रसिद्ध झालेली पहिली कथा पुन्हा एकवार वाचताना मी हरखून गेलो. पुन्हा प्रकर्षाने जाणीव झाली की, “मदरच्या आग्रहास्तव इथं आलो खरा, पण या जीवनाशी आपण समरस होऊ शकत नाही. कारण त्यासाठी लागणा-या सश्रद्ध धार्मिक भावना आपल्यात नाहीत. आपल्या रक्ताला ओढ आहे ती जंगल, सागर जीवनाची आणि हिंसा, क्रौर्य, साहस आणि शिकारी वृत्तीच्या आदिम प्रेरणांनी जगणा-या माणसांच्या दुनियेची! मी इथं मिसफिट आहे....'
 मला धर्मशिक्षण देणा-या व्हॅटिकन सिटीच्या फादरनी ती कथा वाचली आणि सर्वासमक्ष माझी कानउघाडणी केली.
 “माय सन! हे लिहिताना नक्कीच सैतानानं तुझ्या अंतरात्म्याचा ताबा घेतला असणार. या कथेत हिंसा आणि हरणं मारण्याचा तू धक्कादायक पुरस्कार केला आहेस.. हे.... हे येशूच्या प्रेमाच्या तत्त्वज्ञानात बसत नाही. म्हणून माझा निर्णय ऐक! त सवांसमक्ष आकाशातल्या त्या बापाची जाहीर माफी मागावीस. पुन्हा असं घाणेरड लिहिणार नाहीस अशी शपथ घे! बेटा, यापुढे जर तुला लिखाण करायचंच असेल तर ते खिस्ती धर्माचं तत्त्वज्ञान, येशूच्या प्रेमाचा व विश्वबंधुत्वाचा संदेश- अशा चांगल्या समाजोपयोगी विषयांवर कर."

 मला माझ्या लेखनाचा व निर्मितीचा तो अवमान सहन झाला नाही. मी सार धय गोळा करीत ठामपणे उत्तर दिलं. “फादर, ही माझी प्रतिभाशक्ती आहे. तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर ती त्या आकाशातल्या बापाचीच देणगी आहे. लेखक हो। ईश्वराप्रमाणेच निर्माता असतो. मी जे निर्माण केलं आहे, ते अस्सल आहे. वास्तव

१८४ । लक्षदीप