या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतं तर हा निर्णय कशाला घेतलास? आणि मला तिच्या तालावर नाचायला, तिचं मन सांभाळायला का बोलावलंस? मी जाते आपली थोरल्याकडे. थोरल्या सुनेनं जुळे लव -कुश दिलेत वंशाला. त्यांना खेळवत मजेत राहाते-"
 आणि खरंच दोनच दिवसात ती परत मोठ्या भावाकडे निघून गेली. त्यानंही तिला थांबवलं नाही. तो 'थांब' म्हणाला असता तर आई थांबली पण असती. या वयातही तिनं निगुतीनं सारं केलं असतं. पण तिच्या तोंडाचा अखंड चालणारा पट्टा मात्र थांबला नसता. आणि त्याचा अधिकच त्रास शारीरिक व मानसिक दृष्ट्या खचलेल्या पत्नीला - सरितेला झाला असता.
 गणेशला घरी काही काम नव्हतं आणि सरितेच्या खोलीत बसायला तयार नव्हता. कारण त्याला पाहिलं की ती बेभान होत किंचाळायची “माझी - माझी बेबी कुठयं? तिचं तुम्ही काय केलं?”
 "अगं, अचानक रक्तस्राव झाला आणि तुझा अकाली गर्भपात झाला पाचव्या महिन्यातच. मी खरं सांगतो राणी, माझ्यावर विश्वास ठेव!"
 "नाही, हे सारं खोटं आहे, माझी बेबी जिवंत आहे." तिचा काळजाला घरे पाडणारा हुंदका. “हे पहा - " आपल्या पोटावरून ती हात फिरवत म्हणते, "आत्ता आत्तापर्यंत या पोटात ती बागडत होती, ढुशी मारीत होती... अचानक हे पोट रिकामं कसं झालं?"
 "तुला सांगितलं ना, गर्भपात झाला म्हणून?"
 कसा होईल? माझी तब्येत तर चांगली होती.” ती पुन्हा किंचाळत म्हणाली, तुम्ही खोटं सांगत आहात. त्या दिवशी सोनोग्राफी टेस्टनंतर डॉक्टरसाहेबांनी नाही का सांगितलं, माझी तब्येत चांगली आहे म्हणून. बाळाची पण वाढ चांगली आहे म्हणून.”
 त्याला ते सारं आठवत होतं!
 त्या रात्री तिच्या टपोच्या कळीसारखं उन्मलून आलेल्या गो-यापान टपोच्या पोटावर असोशीनं त्यानं हळुवारपणे ओठ ठेवले होते. बाळाची चाहूल घेण्यासाठी कान लावले होते, तेव्हा ती किती गोड शहारली होती.
 “आई ....गं....' ती किंचित विव्हळली होती.
 "क-काय झालं राणी?" त्यानं काळजीनं विचारलं, तशी ती ओठ दाबत व वेदना जिरवत तशाही स्थितीत समाधानानं चेहराभर हसत म्हणाली,
 "काही नाही. बेबी मस्ती करतेय, लाथा झाडतेय आता."

 "पाह - पाह' असं म्हणत त्यानं पुन्हा तिच्या ओटीपोटाला कान लावला आणि म्हणाला, “खरंच, पण ही सणसणीत लाथ वे आक्रमक हालचाली ह्या मुलाच्या आहेत. मी सांगतो, नक्कीच आपल्याला मुलगा होणार."

१९६। लक्षदीप