या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५. लंगडा बाळकृष्ण

पुर्वार्ध
तो एक बाप

 तुम्हाला आश्चर्यचकित व्हायचं काही कारण नाही. कारण बसस्टॅडवरील ऑटो रिक्षावाल्यांची नजर आता तयार झाली आहे. ते नेमकेपणानं तुम्ही ‘जय महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी जिल्ह्यातील गाव - तालुक्यातून किंवा जवळच्या जिल्ह्यातून आले असणार हे अचूकपणे ताडतात. आपणहून तुमच्याजवळ येतात आणि मटर टाकून तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातात.
 ‘जय महालक्ष्मी हॉस्पिटल.'
 तसं फार मोठं सुसज्ज व आधुनिक हॉस्पिटल म्हणता येणार नाही. पण 'माऊथ पब्लिसिटीनं प्रसिद्ध झालं आहे. हमखास मुलगे पैदा करणारं हॉस्पिटल म्हणून खेड्यापाड्यात त्याचं नाव आहे.
 आणि दवाखान्यात जर कुणी चक्कर कधी मारली व चर्चा ऐकली तर कानावर कधी चुकार क्षणी शब्द पडून हमखास जातील. “आज पाच हजार खर्च करा, उधा पाच लाख वाचवा...."
 पण कृपया मला त्याचा अर्थ उलगडून सांगायचा आग्रह करू नका. तुम्ही तव सुज्ञ नक्कीच आहात.
 नाही तर, आज तुम्ही तुमच्या बायकोला, आईसह कशाला या दवाखान्यात आणलं आहे?
 कमॉन यार! कशाला उगाच ताक मागायला जाताना भांडं लपवता?

 पुत्रजन्माचा सोस असणारे तुम्ही एकटेच नाही आहात. ती नमुनेदार भारतीय मनोवृत्ती आहे. आपलं धर्मशास्त्र सांगतं की, मुलानं अग्नी दिला नाही तर आत्म्याला सदगती मिळत नाही. गरुड पुराणात हे स्पष्टपणे म्हटलं आहे. तुम्ही आम्ही हिंदू मंडळी - जात कोणतीही असो - भाविकच ना! आणि या एका बाबतीत एकमत. पुन्हा मुल" हा वंशाचा दिवा. भले आपण सामान्य कारकून, शाळा मास्तर किंवा शेतकरी

२० ६ । लक्षदीप