या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुत्र्यांना मुक्त केलं. क्षणार्धात दोन्ही कुत्री त्या उघड्या गाठोड्यामधील आठ दहा भ्रूणांच्या मांसल गोळ्यांवर तुटून पडली. त्यात तुमच्या मुलीचंही भ्रूण होतं. पाहाता पाहाता दोन्ही कुत्र्यांनी त्या मांसल गर्भाचा फडशा पाडला आणि त्यांची नाक व जीभ तृप्तीनं फुरफुरल्या.
 "हा आजचा कोटा खरं तर पुरेसा नव्हता भुकेसाठी या माझ्या दोन टायगरांना.” डॉक्टर थंडपणे म्हणाले, “पण आज थोडा उपास घडला तर चालेल. माणसाप्रमाणे त्यांनाही डाएट हवंच! आणि हो, तुम्हाला म्हणून सांगतो. या गर्भपाताच्या खेळाचा नियम म्हणजे पुरावा मागे ठेवता कामा नये. यापेक्षा प्रभावी मार्ग दुसरा मला असेल असं वाटत नाही."
 काय झालं तुम्हाला बुवा? का भडाभडा ओकलात तुम्ही? त्या ओकारीच्या आवाजात तुम्हाला का तुमचा हुंदका लपवायचा होता?
 असेल बुवा. पण तुम्ही सांगितलं तरच कन्फर्म होईल. पण तुम्हाला ते विचारून त्रास नाही देणार.

पुर्वार्ध


मी एक आई


 आज पहाटेच मला जाग आली ती एक सुरेल गाण्यानं. मोठ्या कलात्मकतेनं जोपासलेल्या बागेत अगणित मोहरांनी लगडलेल्या आंब्याच्या झाडावर बसून का कोकीळ पक्षी गात होता? मी कधी कोकीळ पाहिला नाही बाई. पण ते सुरेल दैवी स्वर ऐकताना मन फुलून आलं होतं आणि वाटलं, या माझ्या हक्काच्या नव्या घरी मी सहा महिन्यांनी गोंडस बाळासह काल उशीरा रात्री आले व एक आई म्हणून आजपासून इथ माझा खच्या अर्थानं वावर सुरू होत आहे, त्याची ही एवढी छान मधुरतम सुरुवात! बाई गं! माझ्या भाग्याला सीमा नाही.
 डॉक मला चिडवतात ते काही खोटं नाही. “तुझ्यासारखी तीव्र संवेदनक्षम बाई मी पाहिली नाही. अगदी लहानसहान बाबीनंही फुलारून येतेस!"आत्ताही त्यांचे ते शब्द आठवले व मनोमन खुदकन हसले. आणि पटकन जीभ चावली. या प्रसन्न शांततेला त्याची पण बाधा झाली असती. कदाचित डॉकची झोपमोड झाली असता. बेडरूममध्ये नाईट लॅम्पचा फिकट निळा सावळा प्रकाश मनावर सुखाची तृप्त साय आणत होता. डॉकही तसेच आहेत. सतेज सावळे आणि किंचित निळसर झाक यलेले डोळे, त्यांची पत्नी होऊन आल्यापासून त्या निळ्यासावळ्या बाधेनं मी अखड मंत्रमुग्ध राहिलेली आहे.

 आजचा हा या माझ्या - अं हं - माझ्या डॉकच्या आणि आमच्या तान महिन्याच्या राजस सुकुमार बाळाच्या घराला मातृपदाची बढती मिळाल्यानंतरचा हा

२१२ । लक्षदीप