या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७.

 देशमुख यांनी काही ललितगद्य लेखनही केले आहे.'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' या ललितलेखनात देशमुख यांनी जीवनातील आनंदमयता व जगण्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे.स्वत:च्या आयुष्यातील सुख-दु:खाचे प्रसंग सांगून अंतिमत: जीवनावरचे प्रेम व्यक्त केले आहे. पुस्तके,गाणी,कविता,साहित्य, निसर्ग आणि माणसे हा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिला असे या लेखात त्यांनी म्हटले आहे.हिंदी चित्रपटातील काही गाण्यांचे मुखडे घेऊन त्यांनी जीवनातली आनंदमयता व्यक्त केली आहे.कलरफुल' या ललितलेखात निवेदकाच्या मनात जी रंगांची दुनिया वसलेली आहे त्याचे निवेदन आहे.विशेषत: रूपेरी पडद्यावरील रंगप्रतिमांनी लेखकमनाचा पाठलाग केला आहे.या रंगप्रतिमांनी त्याला खिळवून ठेवले आहे.या मनातील रंगीबेरंगी दुनियेची ही सफर आहे.मनात दाटून आलेल्या रंगायन उत्सवाची शब्दरूपी उधळण या ललितलेखात आहे.

८.

 या संपादनात देशमुख यांच्या 'झपाटलेपण ते जाणतेपण' व 'परभणी-कोल्हापूरचे दिवस' या दोन आत्मपर लेखांचा समावेश केला आहे.परभणी-कोल्हापूरचे दिवस या लेखात प्रशासकीय अधिकारी म्हणून या शहराची स्मरणचित्रे रेखाटली आहेत.त्यांच्यातील सर्जनशील आविष्काराला व समृद्ध व्यक्तित्वघडणीला परभणी महत्त्वाचे ठरले.प्रौढ साक्षरता अभियानाचा समन्वय प्रमुख म्हणून त्यांना आलेले विविध अनभव कथन केले आहेत.यामागे आपण काही एक प्रमाणात देशऋण फेडल्याची भावना आहे.तसेच कोल्हापूरला कलेक्टर असताना केलेल्या विविध कामांचे निवेदन केले आहे.या दोन शहरांचे त्यांच्यातील रुजलेपण व गुंतलेपण त्यामधून व्यक्त झाले आहे.देशमुख यांचे भावविश्व समृद्ध करणाच्या या दोन शहरांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे तर 'झपाटलेपण ते जाणतेपण' या आत्मपर लेखात स्वत:च्या जडणघडणीवर झालेले संस्कार आपल्या वाङ्मयनिर्मितीचे प्रेरणास्रोत व जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रांजळपणे सांगितला आहे.

९.

 देशमुख यांनी काही वेगळ्या विषयावरील लेखन केले आहे.प्रशासन अधिकारी म्हणून वावरत असताना भोवतालच्या सामाजिक क्षेत्रांसंबंधीचे हे रिपोर्टाज शैलीतले लेखन आहे.निवडलेल्या विषयाचा सर्वांगाने वेध घेणे हा त्याचा हेतू आहे.२००० घ्या 'साधना' दिवाळी अंकात त्यांनी 'देवबंदचं दारूल उलुम' हा लेख लिहिला.२००४ साली उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवेळी सहाराणपूर जिल्ह्यातील

लक्षदीप ॥ २१