या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोर्डाच्या साहाय्यानं वर्ड फाईलमध्ये दोन्ही प्रसंग लिहून काढले. आणि त्याला ई-मेल केले. आणि पहाटे पहाटे मी बिछान्यावर शक्तिपात झाल्याप्रमाणे स्वत:ला फेकून दिलं.
 सकाळी जाग आली तेव्हा डोकं जडावलेलं होतं. उठणं भाग होतं. सवयीनं ब्लॅकबेरीवर आलेले एस.एम.एस. पाहिले. कांताचाही एस.एम.एस. होता. 'ग्रेट. फार चांगलं निरीक्षण तू नोंदवलं. मला हेच पाहिजे होतं. ५ एप्रिलला येतोय. गुड डे."
 व्हॉट इज गुड इन टुडे? असा मनात प्रश्न उमटला. कारण दिवसभर मला आई-बापांच्या अधीर, चिंतातुर प्रश्नांचा सामना करायचा होता. पण ते माझं काम होतं- कर्तव्य होतं!
 पण रेशीमगाठीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी मी कांताला ई-मेल केलेला मजकूर बायकोला दाखवला, तेव्हा ती गमतीनं म्हणाली, आता आपण जर लग्नाच्या वयाचे असतो तर होकार - नकार तुम्ही नाही, मी दिला असता...
 मी तिच्या खेळकर टीकेनं हसलो, पण मनोमन अस्वस्थ झालो. कारण ती सत्य सांगत होती. आज आम्ही लग्नाच्या वयाचे असतो तर तिला चॉईस माझ्यापेक्षा नक्कीच जास्त राहिला असता. कदाचित तिनं मला नकार दिला असता... कारण ती माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान व देखणी होती, त्या काळी तिच्या बापानं माझी सुरक्षित, क्लास टूची सरकारची नोकरी व घराणं पाहिलं. अनुरूपतेचा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नसेल. मी आनंदात होतो की मला किती सुंदर बायको मिळाली. ती टीपकागद आहे - माझे सूक्ष्मातिसूक्ष्म भाव नेमकेपणानं टिपणारी. ती माझ्याजवळ येत म्हणाली, "मा सहज बोलले हो. त्या काळी आम्हा मराठवाड्यातील मुलींच्या लग्नाच्या वेळी फारशी अपेक्षा नसायच्या. पदरी पडलं अन् पवित्र झालं, अशा संस्कारात आम्ही वाढलो. पण तुम्ही कधी नवरेशाही केली नाही, त्या काळात दुर्मीळ असणा-या समानतेनं मला वागवलंत आणि माझं करिअर होण्यात तुमची साथ लाभली. तुम्ही मनात काही आणू नका. आणि सहवासानं लोणच्याप्रमाणे आपला संसारही छानपैकी मुरत गेलाय - खमंग, चविष्ट झालाय. खरंच सांगते मी.”
 रुतलेला काटा हलकेच काढल्यावर जो आराम वाटतो, तसं मन आश्वस्त यालं मी समाधानानं हसलो. “पण आपल्या नातवाची काळजी वाटावी अशी उद्याचा,

-तीस वर्षांनी परिस्थिती येईल ही शक्यता खरी वाटते. देव करो. तसं न होवा. पण मनात विचार आलाय माझ्या. उद्या आपला नातू सुमार रूप-बुद्धी व छोट्या नोकरीचा निघाला तर-तर... दिवसभर कार्यालयात तिचा हा प्रश्न मन:पटलावर इको इफेक्टप्रमाणे पुन्हा पुन्हा आदळत होता. आणि माझा निश्चय होत होता - कांताच्या केस स्टडीला पूर्ण मदत तर करायची, पण त्याच्या कलेक्टर म्हणून चालवलेल्या स्त्रीभ्रूणहत्या विरोधी अभियानात सहभाग द्यायचा.

२२२ ॥ लक्षदीप