या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण झाला होता. पण आज समस्त शहरवासीयांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागत होतं. त्याची त्यांना कदाचित जाणीव असावी. ते त्यासाठी तयार पण असावेत. त्यांचं जमलेल्या समुदायाकडून हाय-हाय ने स्वागत झालं. कॅमे-याचे फ्लॅश लखलखले. देगावकर शांत होते. “मला काही बोलायचं नाही. मला आधीच उशीर झालाय.' असं म्हणत ते आत जाऊ लागले, तसं मीडियानं त्यांना गराडा घातला. “आम्हांला काही विचारायचं. एक-दोन प्रश्न प्लीज घ्यावेत आपण. फार नाही, फक्त पाच मिनिटं..."
 देगावकर जाता जाता थबकले. क्षणभर त्यांनी मनाशी विचार केला. हीच योग्य वेळ आहे - समाजाला धक्का देण्याची. खडबडून जागं करण्याची. त्यामुळे आता । उघड बोलायला हरकत नाही. ठीक आहे. ते म्हणाले, “तुम्ही काही विचारण्यापूर्वी मीच स्पष्ट करतो. होय, आजचा गे-समलिंगी संबंध असणा-यांचा परिचय - मैत्री मेळावा आहे. फेसबुक वर रेशीमगाठीनं नवी साईट ओपन करून त्यांना आज मीच आमंत्रित केलंय. आता या क्षणी पन्नास गे पुरुष जमा झाले आहेत."
 “तुम्ही समलिंगी विवाहाचं समर्थन करीत समाजातील विकृतीला मान्यता नाही देत आहात?"
 “आजच्या जमान्यात पण तुम्हाला मला सांगावं लागतंय की, सेक्शुअल प्रिफरन्स इज ए पर्सनल चॉईस. गे रिलेशनशिप हे वास्तव आहे, ते तुम्ही - आम्ही कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरी ते बंद होणार नाही, हे समजून घ्या."
 "व्यक्तिगत पातळीवर हे ठीक आहे, पण तुम्ही त्याला सामाजिक रूप देत आहात. ते कितपत योग्य आहे?"
 "त्याचं उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला २०११ साली घेऊन जातो. त्या वेळी भारताच्या जनगणनेचे आकडे प्रसिद्ध झाल्यावर व मुलीचं झपाट्याने कमी होणारं प्रमाण पाहून एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते, पुढील काळात गे मॅरेज मोठ्या प्रमाणात होतील. आज ते राजकारणात नाहीत, त्यांना मी आज या कार्यक्रमासाठी आमंत्रितही केलं होतं. पण प्रकृती अस्वास्थामुळे ते आले नाहीत -”
 *आणखी एक सर -"

 "प्लीज. पाच मिनिटं संपली आहेत." देगावकर म्हणाले, “मला गेलं पाहिजे. पण जाण्यापूर्वी एक सांगतो, भारतभूमी, महाराष्ट्र आणि खास करून आपला हा जिल्हा लँड विदाऊट डॉटर्स होत आहे. तीस वर्षांपूर्वीची 'मातृभूमी ही फिल्म काढणारा दिग्दर्शक काळाच्या किती पुढे होता हे आज मला जाणवतं. आपण भारतातल्या समस्त पुरुष, ऑफकोर्स आपल्या बायकांच्या सहमतीनं म्हणा व त्यांच्यावर बळजबरी करून, गेली तीस चाळीस वर्षे गर्भातच मुली मारत आलो आहोत, त्यामुळे भारतातील काही राज्यात पुन्हा पाच पांडव - एक द्रौपदी म्हणजेच बहुपतीत्वाचा जमाना आला आहे. जर ही जैविक असमानता पुन्हा समतोल करायची असेल तर

लक्षदीप । २३१