या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रेरणा : त्याला आता उशीर नाही झाला? तुमची कादंबरी प्रकाशित होऊन ज्ञानपीठही मिळालं... ती लिहिताना नाही वाटलं आम्हालाही समजून घ्यावं? प्रतिभा : तुम्ही अनेक क्लासिक कॅरेक्टर्स निर्माण केलेले जिनियस रायटर. पण या शहनाजला, गुरूच्या प्रतिभेला नाही न्याय दिला भाईजान तुम्ही. लोकांच्यातली माझी प्रतिमा खलनायकी केलीत. (आवेगानं) खरंच तुम्हाला असं वाटतं, गुरूनं माझ्यामुळे आत्महत्या केली? अब्बास : कठीण आहे काही ठामपणे सांगणं... पण गुरूच्या संपूर्ण अस्तित्वाला मी नेमकेपणानं कादंबरीत पकडू शकलो नाहीये. काहीतरी निसटून गेलंय हे मात्र खरं. प्रेरणा : कादंबरीत ते निसटून गेलेय जे तुमच्यासारख्या जिनियस रायटला एक पुरुष असल्यामुळे कळणं अवघड आहे. आणि ते म्हणजे गुरूशी असलेले भावबंध. आमचे दोघींचे. प्रतिभा : (चकित होऊन प्रेरणाकडे पाहात) मी खरंच गुरूच्या, आणि तुझ्या संसारात यायला नको होतं... प्रेरणा : (कडवट हसते) जाऊ दे प्रतिभा.. शकिलनं म्हटलंय ते खरं आहे... नसीब मैं जिसके जो लिखा था वो तेरी मैफिल में रास आया, किसीके | हिस्से में प्यास आयी, किसीके हिस्से में जाम आया... अब्बास : अंहं... आपल्या तिघांच्याही हिश्याला फक्त प्यास आली... कारण तिघांच्याही आयुष्यात महत्त्वाचा होता तो फक्त गुरू. (क्षणभर थांबून) बरं, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? सॉरी, तुम्हाला आल्या आल्या विचारायचं विसरूनच गेलो. प्रेरणा : (अस्वस्थ हसत) भाईजान... माझं ड्रिक एकच ...ते...ते मिळेल? अब्बास : अगं... किती पिशील? रात्रंदिवस तेच?... अशानं मरून जाशील एक दिवस. प्रेरणा : त्याच दिवसाची वाट पाहतीये भाईजान, जगण्यासारखं काय राहिलंय आता आयुष्यात? गाण्याचं करिअर पण संपल्यातच जमा आहे. माझ्यात गुरूसारखं धाडसं नाही. नाहीतर... (विमनस्क हसते) प्रतिभा : (किंचित उत्तेजित, वरचा स्वर) मी मात्र जगणार आहे... अजूनही गुरूच्या फिल्ममध्ये असायची तशी काही कॅरेक्टर्स मला करायची आहेत. (अभिमानाची झलक) गुरूची प्रतिभा आहे मी.. मला तर जगायला पाहिजे... (आवेगानं) हल्ली तर मी कॅमे-यापुढे इमोशनल सीन देताना माझ्या सगळ्या दुःखाचा आसवांवाटे निचरा करते आणि कोरडी होऊन जाते. (काही क्षण शांतता.) अब्बास : आज तुम्ही दोघी बोला... फक्त माझ्यासाठी बोला... तुम्ही दोघींनी लक्षदीप ॥ २३९