या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। । । हा एकटेपणा मला गिळून तर टाकणार नाही ना? (फोन करतो. रंगमंचावरील अब्बासच्या घराचा भाग उजळतो) गुरू बोलतोय... अब्बास : गुरू? एवढ्या रात्री? कसा आहेस गुरू? गुरू : नेहमीप्रमाणेच अस्वस्थ ... बेभान... बेचैन. अब्बास : (हळुवार) झोप येत नाही गुरू? या फिर शायद किती की याद में खुद को परेशान कर रहे हो? गुरू : म्हणूनच तुला फोन केला... यार... गेले तीन दिवस... तीन रात्र जागा आहे मी... क्षणभरही पापणीला पापणी लागलेली नाही... (एकूण व्याकूळ स्वर) अब्बास... मेरे पास आ... अभी ... इसी वक्त... तू नहीं आया तो | मैं, मैं शायद मर जाऊंगा यार... अब्बास : मी येतोय... निघतोच मी... पण पण एक सांगू? जरा बेतानं पी दोस्त...! गुरू : देंट इज नॉट पॉसिबल अब्बास... आयुष्यात कोणतीच गोष्ट मी कधी हिशोबानं केली नाही. आणि आताशी तर हीच माझी एकमेव साथीदार आहे... उसे तो में बेहिसाब पिऊंगा... आज संध्याकाळपासून निद्रादेवीची आराधना करत व्हिस्कीमध्ये कांपोजच्या गोळ्या घालून पितोच आहे... पण साली किकही येत नाही... आणि झोपही येत नाही. अब्बास : (प्रचंड धक्का, क्षणभरानं सावरत) क... क... काय? तू व्हिस्कीत कांपोजच्या गोळ्या घालून आहेस? गुरू...नको रे...(उसळत) स्टॉप इट... थांबव हा वेडेपणा... मी येतोय... मित्रा. लवकरात लवकर. गुरू : बँक्यू माय फ्रेंड. तू नसतास तर मी कधीचाच संपून गेलो असतो. अगदी | एकटा आहे रे मी या अफाट दुनियेत. माझी प्रेरणा मला सोडून गेली आहे. तर प्रतिभा माझ्याकडे येत नाही... या अफाट बंगल्यात मी... मी अगदी भुताप्रमाणे इकडून तिकडे हिंडतोय... ही वेडी रात्र चढतेय... हा धुंवाधार पाऊस भीती जागृत करतेय... आणि झोपही येत नाही... डोळे ताठरलेले... आग आग होतेय.. अंग अंग ठणकतंय... मन भरकटतंय... कसले कसले विचार मनात घुमतायत... पता नही... माझं मन भूतखाना झालंय यार...। अब्बास : मी निघतोच, पण आता दारूतून कंपोजच्या गोळ्या घ्यायच्या नाहीत सांगून ठेवतो. (फोन ठेवतो. रंगमंचावरून निघून जातो.) गुरू : (टीपॉयवर असलेल्या फोनचा रिसीव्हर उचलतो आणि नंबर फिरवतो. अधीर मनोवस्था, मग कानाला रिसीव्हर लावत) हॅलो... कौन, अम्मीजान? प्रतिभा... याने शहनाज है क्या? मैं गुरू... क्या? किसी पार्टीमें गयी है? लक्षदीप ॥ २४१