या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रेरणा : हां भाईजान... आमच्या गुणसूत्रांमध्येच कदाचित वर्षानुवर्षे समर्पणाचे | आणि एकनिष्ठेचे संस्कार वास करून असावेत. पण मनाची तडफड तर होतेच ना... अब्बास : (नि:श्वास टाकून) स्वत:ला सावरायला आपणच शिकलं पाहिजे प्रेरणा.. प्रेरणा : कदाचित सामान्य स्त्री असते, भावना बोथट असत्या तर जमलंही असतं... पण त्या दोघांप्रमाणे मीही स्वरांच्या दुनियेतली कलावंत आहे.... त्या सुरांच्या दुनियेत प्रत्येक तान शुद्धच लागते... भेसळ खपत नाही तिथं भाईजान... अब्बास : प्रेरणा... प्रेरणा : एकांतात गुरूच्या संगतीत असताना गुरूलाही पूर्ण खात्री असते. हे प्रेरणेच्या देहाचे रोमांच.. उमाळे... त्याचेच आहेत. अम्लान - शुद्ध आहेत... ते परपुरुषाच्या स्पर्शापासून मुक्त आहेत... पण माझं काय भाईजान? (हंदका, स्वरात कमालीची वेदना) त्याचा स्पर्श अनुभवताना वाटतं, की हाच स्पर्श प्रतिभेनेही तेवढ्याच उत्कटतेनं अनुभवला असेल... त्याचे रोमांत तिच्याही वाट्याला आले. असणार.. यात मला ताजेपणा वाटत नाही. उष्टं जेवणात चालत नसतं, तसंच जीवनातही... अब्बास : तुला कोणत्या शब्दानं दिलासा देऊ प्रेरणा? काल परवा आपण खूप बोललो आहोत. वास्तव आपण स्वीकारलचं पाहिजे. आणि वास्तव हे आहे की, आज तो प्रतिभेविना राहू शकत नाही.. आणि तुझ्याविना तर नाहीच नाही... प्रेरणा : भाईजान... अब्बास : आपण सगळेजण या फिल्म इंडस्ट्रीचे ऋणी आहोत. आज जे कोणी आहोत ते याच इंडस्ट्रीमुळे; तिचं कर्ज फेडायचं असेल तर ही कला पुढे नेली पाहिजे, चांगले सिनेमे काढून. आणि ती ताकद गुरूमध्ये आहे. आपण त्याला साथ द्यायला पाहिजे चांगले सिनेमे काढण्यासाठी. माणूस म्हणून आपली सुखदुःखे कितीही खरी असली तरी कलेपुढे ती महत्त्वाची नाहीत... प्रेरणा.. म्हणूनच तुला परत घेऊन आलो आहे. गुरू फार कोलमडून गेला आहे... त्याला तू सावर. त्याला नवा सिनेमा सुरू करावयाचा आहे. सचिनदांनी फार अप्रतिम चाली दिल्या आहेत साहिरच्या गीतांना. त्याचं तू सोनं करशील प्रेरणा. हे बघ... हे बघ.. आपण गाणी रेकॉर्ड करून सुरुवात करू गुरूच्या या नव्या सिनेमाची. मी प्रतिभेलाही असाच तयार करीन काम करण्यासाठी आणि हे तुलाही केलं पाहिजे... गुरूसाठी आणि त्याहून जादा या फिल्म इंडस्ट्रीसाठी... २५४ । लक्षदीप