या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माफ केलं ते माणूस म्हणून नव्हे तर कलावंत म्हणून... माझ्यातलं माणूसपण त्यामुळे कायमच शरमिंदं झालं आहे... त्याला सतत अपराधी वाटत आहे.... त्यामुळे कदाचित मला डिरेक्शनमध्ये झोकून देता येत नाहीये... अब्बास : धिस इज टू मच.. तू ठार वेडा झालेला आहेस... का हाही तुझा पुरुषी कलावंताचा इगो आहे?... आपल्या जवळच्यांना घायाळ करून तडफडवणं आणि सॅडिस्ट वृतीने त्याचा आनंद उपभोगणं... । गुरू : अब्बास... आता वेडा मी, का तू... (घायाळ स्वर) तू माझा इतक्या जवळचा मित्र... कॅरेक्टरच्या छोट्यात छोट्या भावनासुद्धा समर्थपणे टिपणारा लेखक तू.. तू असं म्हणावसं? अब्बास : हो... मीच म्हणतोय गुरू. तुला सगळं काही सुरळीत चाललेलं कदाचित रुचत नाही. तुझ्या कॉम्प्लेक्स मनाला सतत दु:ख, वेदना, तडफड हवी असते कुरवाळायला... दुःखाची नशा चढते तुम्हाला... वेदनेत कुठे तरी सुखाची अनुभूती जाणवते तुम्हाला. गुरू : सचमुच तू दिलसे बोलता है, इसीलिये गुस्सा नहीं करूंगा (विचारात मग्न) अब्बास, तू म्हणतोस ते काही अंशी का होईना पटतं... मला खरंच सुख सहन नाही होत,... कारण त्याची सवय नाही... कलावंताला कदाचित दु:खाचीच नशा चढते... तीच त्याच्या कलानिर्मितीची प्रेरणा असते का रे? अब्बास : गुरू... आज मला तुझ्याकडून सरळ उत्तर हवंय... आपल्या पिक्चरचं काय? किती दिवस असे वाया घालवायचे? प्रतिभेनं या फिल्मसाठी दोन दोन बिगबजेट पिक्चर सोडले आहेत... त्याही डेट्स तू वाया घालवणार? | गुरू : कसं सांगू यार तुला.. शूटींगच्या पहिल्या दिवसापासून मला जाणवतंय... आय... आय... कांट डिरेक्ट धिस फिल्म... एक माणूस म्हणून मी फार संभ्रमित आहे. त्यामुळे अॅक्टिंग करताना मी फार कॉन्शस असतो मित्रा - त्यामुळे नॅचरल अभिनय होत नाही. म्हणून मला सिनेमा करावासा वाटत नाही. अब्बास : गुरू, थोडे स्वत:ला सावर. दोन वर्षापूर्वी प्रतिभा तुझ्या जीवनातून निघून गेली, तेव्हा तू स्वत:ला सावरलं होतसंच की - आता ती फक्त सिनेमासाठी काम करायला आलीय असं समज आणि प्रोफेशनल होत अॅक्टिंग कर, गुरू : तेच तर जमत नाही. मला समजतं, ये ठीक नहीं, पिर भी ए कंबख्त दिल कहाँ मानता है. अब्बास : आता मात्र तू माणूस म्हणूनही स्वार्थी, अप्पलपोटा झाला आहेस. गुरू, लक्षदीप । २६१