या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चाळीस वर्षाच्या जिंदगानीमध्ये इस बैचेन रूहने जो महसूस किया है... उससे जहन्नूम भी बदतर नहीं हो सकता... नाही... नाही, माझ्या वाट्याला येणार आहे तो फक्त काळा भिन्न अंधार... कधी न संपणारं काळोख पर्व. मला भीती वाटते त्या प्रवासाची.. पण, पण मला त्या प्रवासाला निघालं पाहिजे... नव्हे जाणं भाग आहे... मी.. मी.. ते आपल्या हातांनी ओढवून घेतलं आहे. बसु, बस्, बस्, आय अॅम फेड अप वुईथ धिस लोनली लाईफ अॅण्ड माय... सेन्सिटिव्ह माईंड, (क्षणभर थांबून) विसरलास गुरू... या एकाकी जीवन अवस्थ, सेन्सिटिव्ह माईंडमधूनच कलेचा जन्म होतो... जितका प्रखर... जितका प्रखर अस्वस्थ आत्मा.. तेवढीच जिवत, सर्वव्यापी आणि अजरामर कला. हैं... किती विचित्र बाब आहे नाही... या कलेसाठी. स्वत:ला आणि आपल्या माणसांना दुखवावं लागलं... रक्तबंबाळ करावं लागलं. मी - मी ते केलं... आणि कलावंत म्हणून ते गरजेचं होत. पण पण माझा स्वर... माझी प्रेरणा; माझं कलाजीवन - माझी प्रतिभा... या दोघींना मात्र मी या जिंदगानीमध्येच जहन्नुमपेक्षा बदतर जिंदगी बहाल केली. मला तुम्हा दोघींची एकदा क्षमा मागायची आहे.. तेवढं राहूनच गेलं... आता आपल्या हातानं स्वत:चं जीवन संपवताना ती एक रुखरुख राहणार... पण या क्षणी तुम्ही दोघी मला भेटायला हव्या होतात. या क्षणा एका डोळ्यात प्रेरणा तरळते आहे, दुस-या डोळ्यात प्रतिभा. त्या दोघा एकमेकांत कशा विरघळून जात एक होत आहेत... हा भ्रम तर नाही?... पण तो किती सुखद आहे. अफसोस... अब क्या फायदा इसका? (डाळ पुन्हा पुसत) आणि तो माझा मित्र अब्बास, त्याला तर मी वेळीअवेळी परेशान केलं... उद्या सकाळी मला मेलेलं जेव्हा तो पाहील, तेव्हा तो किता दु:खी होईल... माफ कर मित्रा... तुला आजवर दुसरं काय दिलं आहे ? पुर्नजन्म असेल आणि मला पुन्हा मनुष्यजन्म मिळणार असेल तर तुझ्या पोटी जन्म हवा अब्बास... तुझी सेवा करून तुझ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. आज या अंतिम घडीला तूही बरोबर नाहीस... मेरा कोई अपना नही ... ठीक आहे.. हीच जर माझी नियती असेल.. तर कमॉन मि. डेथ. कमॉन. (अचानक तो थांबतो. तडफडत खाली कोसळतो.) पडदा २६६ । लक्षदीप