या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्ण खात्री होती. कारण ज्या सिरंक्यूस शहरात मी आठ दिवसापूर्वी आलो होतो एका अभ्यासक्रमासाठी, तेथे असह्य थंडी, धुकं, दोन वेळा किंचित पावसानं आसमंत ‘फॉल' ऋतूकडे झुकल्याचं दिसत होतं. पण आज त्याचा मागमूसही नव्हता. स्वच्छ निळे आकाश, सौम्य ऊन आणि मस्त मानवणारी थंडी... आणि अनपेक्षितपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विविधरंगी पानांची निसर्गनामक कृष्ण खेळत असलेली रंगपंचमी... मी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात एकदा खास न्यूजर्सी ते नायगरा प्रवास करतो कारण, ती ही रंगाची उधळण पाहायला.... आणि नायगराची आसमंत व्यापणारी खर्जातील तान ऐकायला... दोन्ही गोष्टींचा माणसाला खच्या रसिकाला कधीच कंटाळा येणार नाही....." मित्राच्या संभाषणातून माहिती झालं की, भारतासारख्या उष्ण प्रदेशात पानगळीचा ऋतू आला की, उष्म्यानं हिरवी पानं पिवळी होऊन वाळून पडतात. पण न्यूयॉर्क या अमेरिकेच्या थंड प्रदेशात हिरवी पानं एकदम पिवळी होत नाहीत, ती विविध रंग धारण करतात. नारिंगी, निळी, लालगर्द, गडद हिरवी आणि हलकी फिकट पिवळी... आणि मग गळून पडतात. हा पानांचा बदलत्या रंगांचा मोसम हा एक ते दीड महिना असतो, पण ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा हा एकदम रंगारंग - अत्युच्च कोटीला पोहोचणारा... आणि नेमकं याच काळात नायगराला जात होतो आणि निसर्गाची मनसोक्त चाललेली रंगपंचमी पाहात, मनात साठवत होतो. डिजिटल कॅमे-यात ती टिपायचा प्रयत्न करीत होतो... कारमध्ये टेप, डीव्हीडी दोन्हींची सोय होती. मित्रानं टेप लावला आणि आशाचा नितळ स्वर निनादू लागला... ही वाट दूर जाते स्वप्नामधील गांवा..." अभावितपणे मित्रानं आमच्या मनाची भावनाच व्यक्त करणारं गीत लावलं होतं. आमचं अमेरिकेला दोन महिन्यांसाठी येणं आणि आजचं हे पानांचे विविध रंग पाहात नायगराला जाणं स्वप्नवत वाटत होतं. नायगरा खरंच नाही का आमच्यासाठी एक स्वप्नातलं गाव होतं? आजच्या माहितीच्या स्फोटाच्या जगात भारताच्या ताजमहालाप्रमाणे नायगरा धबधब्याबद्दल मनात असो-नसो, सतत कानी व नजरेस काही ना काही येतच असत. पण ‘जो बात तुझमें है, तेरी तसबीर में नहीं-' प्रमाणे प्रत्यक्ष पाहाणं व नायगरा अनभवणं हेच खरं. इथं एरवी एक सुरेख काव्यप्रतिमा म्हणून व श्रीराम - लव, कुशाच्या संदर्भात सार्थ वाटणारी प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट' मिथ्या वाटत होती... | आता काही क्षणांतच नायगराला आम्ही पोहोचणार होतो. मन अधिरले हात आणि नायगरावर ज्या असंख्य कविता आजवर नायगरा पाहन - अनभवून लिहिल्या २७८ ॥ लक्षदीप