या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्णय घेतले पाहिजेत. चाकोरीबाहेर जाऊन काम केलं पाहिजे. पण त्याला ‘सपोर्ट सिस्टिम' कुठे आहे? ती जाऊ दे. असं सरळ काम कुणाला हवं आहे? नागरिकांना हवं असतं; पण लोकप्रतिनिधी, तथाकथित समाजसेवक आणि मीडियाशी प्रशासकाला सामना करावा लागतो. माध्यमातला भ्रष्टाचार सर्वव्यापी झाल्यामुळे त्यांच्याकडून पाठिंबा तर सोडाच, अनेक चांगल्या व प्रामाणिक कर्मचारी / अधिका-यांना बदनाम केलं जातं. 'ट्रायल बाय मीडिया' हा अतिशय भयानक मानसिक खच्चीकरण करणारा प्रकार आहे.
 जिल्हा परिषदेचे प्रमुख काम, मानवी विकास हे आहे. त्यासाठी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी, महिला-बालकल्याण आणि महिला सक्षमीकरण असं सूत्र मांडून ‘मानवी विकास निर्देशांकाच्या परिभाषेत बसवून मी सांगली जि. प. चं स्वतंत्र महिला धोरण आखलं. विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर यांनी त्याची तारीफ केली. पण श्रेयासाठी हपापलेल्या एका महिला सभापतीनं प्रचंड विरोध केला. ‘लक्ष्मी (आर्थिक सक्षमीकरण), ‘सरस्वती’ (शिक्षण व मानवी विकास) आणि ‘दुर्गा’ (महिला सबलीकरण) ही प्रतीकं, ग्रामीण महिलांना चटकन समजावं म्हणून सर्रास वापरतात. तिचा मी टीपीत वापर केला. म्हणून एका लोकप्रिय मासिकात माझी ‘मनुवादी' म्हणून संभावना केली गेली आणि माझी जातही काढली गेली. तेव्हा 'युक्रांद' व 'साधना' अशा पुरोगामी संस्था - संघटनांशी नाळ असलेल्या माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल? झक मारली आणि या फंदात पडलो, असं वाटलं. विविध योजनांचा मेळ घालीत मी हे धोरण कल्पकतेनं व परिश्रमपूर्वक तयार केलं होतं. पण मनस्ताप व बदनामी वाट्यास आली. तरीही मी शांतपणे काम करीत राहिलो. दीड वर्षांच्या कालावधीत बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शिक्षण, हागणदारीमुक्ती व जलस्वराज्याच्या माध्यमातून मानवी जीवनाची गुणवत्ता वाढविण्यात अंशमात्राने का होईना, यशस्वी झालो. प्रशासकाचा ‘स्वधर्म जपताना मी ठोस भूमिका घेतल्यामुळे, उपजिल्हाधिकारी पदावर असताना माझ्या सलग तीन बदल्या झाल्या होत्या. त्याचे तपशील देत नाही. पण बदली हे असं ब्रह्मास्त्र आहे, जे वापरून अडचणीच्या वाटणाच्या (कार्यक्षम व स्वच्छ) अधिका-यांना नामोहरम केलं जातं. वारंवार होणा-या बदल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे व कुटुंबीयांचे हाल होतात ती किंमत मी मोजली आहे. एक तर स्वत:सोबत प्रत्येक बदलीच्या ठिकाणी कुटुंबीयाना फरफटत नेणं, नाही तर हवी ती जागा मिळवून’, ‘त्यांच्यात सामील होऊन, मन मारून काम करणं, यांपैकी एक पर्याय स्वीकारावा लागतो. पहिला पर्याय मी आजवर स्वीकारला आहे

 बहुसंख्य नोकरशहा मला व माझ्यासारख्यांना वेडा म्हणतात. त्यांचं साधं सरळ स्पष्टीकरण असतं - शेवटी आपण नोकर आहोत. निर्णय घेण्याचे व देशाची.

लक्षदीप ॥ ३०५