या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसून आले आहे. लोकांचे जीव वाचवणे व त्यांच्या चीजवस्तूंची सुरक्षा राखणे या कामात ब्यूरॉक्रसीने जनतेच्या अपेक्षेला उतरत काम केले आहे. तसेच दुष्काळात एकेका जिल्ह्यात लाख-लाख मजूर रोजगार हमीच्या कामावर होते, ते सारे कर्तृत्व नोकरशाहीचे म्हटले पाहिजे. आज देशभर महिला बचत गटांचे विस्तृत जाळे विणले गेले आहे, त्याचे मोठे श्रेय विकासप्रशासन राबवणा-या पंचायत राज यंत्रणेला आहे आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे व शांततापूर्ण लोकेच्छेचे प्रतिबिंब पडलेले सरकार बदलण्याचे काम कोण करते? महसूल यंत्रणाच ना? प्रशासनात खूप ‘अनसंग हीरोज आहेत. त्यांची प्रसिद्धी होत नाही एवढेच. पण प्रत्येक स्तरावर असे असंख्य अनुभव जनतेला वेळोवेळी येत असतातच. महाराष्ट्रात गावेच्या गावे तंटामुक्त करणारे तलाठी व गावेच्या गावे निर्मल करणारे ग्रामसेवक व त्यांना प्रेरणा देणारे, लीड फ्रॉम द फ्रंट नेतृत्व देणारे महसूल व जिल्हा परिषदेचे अधिकारी असंख्य आहेत. नागरिकांना सामावून घेत 'पीपल्स बजेट'ची संकल्पना मांडणारे माजी पुणे मनपा आयुक्त नितीन करीर, सोलापूर शहराची बंद पडत चाललेली शहर बस सेवा नफ्यात आणणारे आर. टी. ओ. मदने, जिल्हा परिषद सांगलीमध्ये महिला धोरण राबविणारे अस्मादिक, एकाच वेळी पाच लाख शेतक-यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान (पुस्तिकेच्या रूपाने) पोचवणारे कोल्हापूरचे अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, प्राणांचे मोले देऊन हायवेचा दर्जा टिकवणारे बिहारचे सत्येन दुबे व पेट्रोलियम भेसळीचे रॅकेट उलगडणार मंजुनाथ, प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणरारे व्ही. पी. राजा व अनिलकुमार लखिना, शाळाशाळांमध्ये संविधानाची उद्देशिका पोचवणारे खोब्रागडे, ठाणे शहर बदलणारे टी. चंद्रशेखर, कोकण रेल्वे व दिल्ली मेट्रोचे जनक श्रीधरन... किती उदाहरणे द्यावीत?
 लाल टोपीचे मन सांगते की, पेला अध्र्याहून जास्त खाली आहे, पण तो पूर्णपणे रिकामा नाही. शकील बदायुनीचे एक गीत आहे माणसाबद्दल - "ना में भगवान हूँ, ना मै शैतान हूं. दुनिया जो चाहे समझे, मै तो बस इन्सान हूं.” नोकरशहा तशीच आहे - थोडी चांगली, पण जरा जास्त वाईट.
४. पिवळी हॅट काय म्हणते?

 पंडित नेहरूच्या अगदी विरुद्ध मत सरदार पटेलांचे होते. त्यांना ब्यूरोक्रसी ही भारताच्या राज्यकारभारासाठी व विकास प्रशासनासाठी आवश्यक वाटत होता. १० ऑक्टोबर १९४९ रोजी कॉन्स्टिट्यूअंट असेंब्लीमध्ये भाषण करताना अनंतशयनम् अय्यंगार यांची नोकरशहांबद्दलची अशोभनीय टीका चुकीची आहे असे सांगत फाळणीनंतर निर्वासितांचे पुनर्वसन व कायदा - सुव्यवस्था राखण्याचे अवघड काम पूर्ण कार्यक्षमतन तत्कालीन आय. सी. एस. अधिका-यांनी केल्याचे सांगून, देशाचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी व देशाची एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी अखिल भारतीय सेवेची

लक्षदीप ■ ३६७