या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया

 हर हंसी चीज का मैं तलबगार हूँ।
 रसका, फूलोंका, गीतोंका मैं बीमार हूँ
 अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीमधला एक मैलाचा दगड असलेला पण विस्मरणात गेलेल्या 'सौदागर' चित्रपटातलं हे रवींद्र जैन यांचं गीत मला आजही लक्षात आहे.कारण ते जीवनातील प्रत्येक सुंदर गोष्टीवर प्रेम करणा-या रोमँटिक शायरचं मनोगत आहे. जो जीवनावर समरसून प्रेम करतो व जीवनाचे ध्येयच मुळी आनंदाचा शोध व आस्वाद आहे. अशा सर्वच जीवनवादी लोकांचं यापेक्षा वेगळं जगण्याचं तत्त्वज्ञान असू शकत नाही. माझंही असंच काहीसं जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. मी माझ्या जीवनविषयक कल्पना, आस्था, अपेक्षा याबाबत सांगणार आहे. मी त्याला माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान म्हणणार नाही, पण त्या स्तरावर पोहोचणारे माझे विचार मांडणार आहे. त्यासाठी हे गीत माझ्या जीवनविषयक दृष्टिकोनाचं एक प्रतीक वाटतं, म्हणून त्यापासून सुरुवात करतो.
 होय. मी मूलत: रोमँटिक, सौंदर्यवादी आहे. माणसाला मिळालेलं जीवन हे आनंदासाठी आहे, इतरांच्या आनंदात विघ्न न आणता मनमुरादपणे जीवनाचा आनंद लुटावा, हे माझे एका अर्थाने तत्त्वज्ञान. ‘खाना पीना मजा करना' या भौतिक सुखाच्या पलीकडे सुसंस्कृत व उच्चतर जाणीव असणा-या सजग मनाच्या आनंदाच्या कल्पना वेगळ्या असतात. माझ्याशी अशा उच्चतर आनंदाच्या काही खास कल्पना आहेत. त्यामध्ये प्रथमतः निसर्ग, माणूस व वनसंपदा येतात. हे तर नितांत रमणीय विषय. सदा आनंद देणारे. त्याचा कधीही कंटाळा येणार नाही. पण माणसाला मन, मेंदू, विचार हास्य आणि अश्रू या पाच अनमोल देणग्या लाभल्यामुळे त्याच्या जोरावर माणसानं स्वर निर्मिले, संगीत रचले, शब्द विकसित केले व त्यातून साहित्य आले. इतर ललित कला आल्या. खोट्या व कृत्रिम असल्या तरी मानवी जीवनाचं कलात्मक दर्शन घडविणाच्या नाटक व सिनेमा या कला आल्या. हे सारे आपल्या आनंदाचे, उपभोगाचे विषय आहेत.

 माझ्या या लेखमालेला तशी विषयाची सीमारेषा नव्हती. पण कलेच्या अंगानं

३८४ ■ लक्षदीप