या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कवितेसाठी पंचप्राण आहेत. तसा मी हरत-हेच्या काव्याचा व साहित्य प्रकाराचा मन:पूत वाचक आहे. पण आज मला माझ्या जगण्याचं जे तत्त्वज्ञान सांगायचं आहे,त्यासाठी हे शायर - कवी अधिक जवळचे आहेत एवढंच!
 त्यातही 'मैं जिदगी का साथ निभाता चला गया - हक फिक्र को धुएँ में उड़ाता चला गया' या गीताची मोहिनी आजही कायम आहे. नांदेडला, मॅट्रिकला असताना मला वाटतं, लिबर्टी टॉकिजमध्ये हा सिनेमा सत्तरच्या दशकात केव्हातरी पाहिला होता. साहिरनं या गाण्याद्वारे सदैव मृत्यूच्या छायेत वावरणाच्या सैनिकांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान उत्कटतेनं मांडलं आहे.
 केवळ सैनिकच युद्धभूमीवर, सीमेवर लढतो असं नाही. सारी मानवजात ही जीवनाचं युद्ध खेळत असतेच. त्यामुळेच तुकोबानं म्हटलंय ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.' आज दहशतवाद तुमच्या आमच्या दारापर्यंत आहे. त्याचा मुकाबला केला पाहिजे. त्यासाठी जिंदगीका साथ निभानाही पडेगा.
 मलाही माझ्या प्रशासकीय जीवनात अनेकदा पराकोटीची हताशता, टोकापर्यंतची सिनिकता जाणवली आहे. चांगलं वागून, चांगलं न्यायाचं काम करूनही वारंवार बदली का पदरी येते? का बदनामी पदरी येते? का दुर्जनांची शक्ती सामान्य, मुक सज्जनांच्या चांगुलपणावर भारी पडते? असे प्रश्न मनास जेव्हा संत्रस्त करतात मी गुणगुणतो.
 "जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया
 जो खो गया मैं उसको भुलाता चला गया.”
 माझ्या ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' या आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा पर्दाफाश करणाच्या कादंबरीला दोन मोठी पारितोषिके गटबाजीमुळे जवळपास एकमत होऊनही मिळाली नाहीत, हे जेव्हा हळहळत परीक्षक समितीच्या सदस्यांनीच सांगितलं, तेव्हा प्रचंड निराशा दाटून आली होती. पण ‘जो खो गया' त्याला विसरायचं असतं व पुढे जीवनाची वाटचाल करायची असते.
 सुख आणि दु:ख या निखळ सत्य बाबी नाहीत, तर व्यक्तिसापेक्ष भावना आहेत, त्यातही पुन्हा कमी अधिक तीव्रता असते. त्यामुळे दोन्हीकडे सम्यक दृष्टीने पाहाता आलं पाहिजे. ‘गम और खुशी में फर्क न महसूस हो जहाँ, मैं दिलको उस मुकाम पे लाता चला गया' असं जेव्हा साहिर सांगतो, तेव्हा जीवनाच्या एका महान सत्याचा साक्षात्कार होतो.

 हे मी मनानं मान्य केलं आहे, त्यामुळे जीवनात कटु प्रसंगाला मी मागे सारत पूर्णपणे विसरायचा प्रयत्न करतो. मी धर्मराजाएवढा नखशिखान्त उदार नाही, शत्रूला माफ करणारा नाही. पण ब-याच प्रमाणात मी माझ्याविरुद्ध जे अकारण वाईट वागले त्यांनाही माफी केलं आहे. तो कटुतेचा क्षण विसरून गेलो आहे. कारण साहिरचं या

३८६ ■ लक्षदीप