या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लाल देड व नुरुद्दिनचा एवढा प्रभाव काश्मिरी जनतेवर आजही आहे की त्यांच्या बोलण्यात या दोघांच्या काव्यपंक्ती - ज्यांना सुभाषितांचे रूप आले आहे - आपलं म्हणणं सांगण्यासाठी वापरतात. जसं आपण तुकोबांचे ‘असाध्य ते साध्य, कारण अभ्यास तुका म्हणे' किंवा 'नाहीं निर्मळ जीवन, काय करील साबण' सारखे अभंग बोलताना वापरतो वा रामदासांच्या मनाच्या श्लोकांचा आधार घेतो, तसंच काश्मिरी जनता सहजतेनं लाल देड व नुरुद्दिनच्या काव्यपंक्ती उच्चारते.
 या दोन सूफी संतकवींची परंपरा ऋषी-सूफी परंपरा म्हणून ओळखली जाते. तिचे नेमके महत्त्व काय आहे हे विशद करताना नायला अली खान यांनी 'The culture of 'Kashmiriyat' in the land of sufi poetess Lalla Ded' या निबंधात म्हटलं आहे की,
 'South Asian Islarm finds its best expression in Kashmir's Rishi - Sufi order and its precious gift known in the valley and beyond as kashmiriyat, of which the kashmiri people are instantly proud. The defining features of Kashmiri Sufism are a belief in both the transcendence and immanence of God, Respect for other religion, emphasis on following the right path, developing mind's potential through mediation and absorption, love for idols of Gods and goddesses and contempt for the Mullah, the priest who teaches a rialistic version of Islam'
 सारांशरूपानं सांगायचं झालं, तर कश्मीरियतचे तत्त्वज्ञान, जीवनशैली ही भक्ती-काव्याद्वारे सिद्ध झाली. तिला जीवनशैलीचे रूप जैनुद्दिन अनिदेन आणि सम्राट अकबराच्या सहिष्णु राजवटीने दिले. त्या काळात भारतात व जगभरही तलवारीच्या बळावर धर्मप्रसार करण्याची प्रवृत्ती आम होती, पण त्याला अपवाद काश्मीरवरील कारणामुळे ठरला. पुन्ह्य जम्मू-काश्मीरचं अलगत्व व वेगळेपण त्याच्या भौगोलिक परिस्थितीत आहे. आजही अत्याधुनिक दळणवळणाची साधनं असताना जम्मू-श्रीनगर रस्त्यावर होणा-या बर्फवृष्टीमुळे आठ-आठ, पंधरा-पंधरा दिवस काश्मीरचा जगापासूनचा रस्त्याच्या मार्गाने असलेला संपर्क तुटतो. पुन्हा अनुपमेय असे निसर्ग सौंदर्य,मात्रनुगात्र गोठवून टाकणारी थंडी आणि दैनंदिन जगण्याची अविरत लढाई यामुळे तेथे सहिष्णुता व आध्यात्मिकता अधिक प्रमाणात आहे. या सा-याची परिपाक म्हणजे त्यांची स्वतंत्र निर्माण झालेली ओळख. तीच काश्मीरियत होय!

 या काश्मीरियतमुळे द्विराष्ट्रवाद काश्मीरला मंजूर नव्हता. जेव्हा पाकिस्ताननं १९४८ साली आक्रमणाद्वारे काश्मीर घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काश्मिरी लोकांनी भारतात सामील होताना जराही खळबळ केली नाही. एका व्यापक अर्थानं काश्मीरियत

लक्षदीप ■ ४१३