या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही भारतीयतेचा भाग आहे; कारण भारतीय संस्कृती पण विविधतेमध्ये एकता जपणारी व धार्मिक सहिष्णुता व सहअस्तित्व मानणारी आहे. ईश्वर एक आहे व तो मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, हा भारतीय हिंदू तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. त्यात लाल देड व नुरुदिननंही हेच तत्त्वज्ञान भक्तिकाव्याद्वारे मांडलं, जे आम काश्मिरी नागरिकांच्या मनात आजही घर करून आहे.
 म्हणून मला माझ्या आठवड्याभराच्या काश्मीरच्या वास्तव्यात काश्मीरियतची बोध होत होता आणि म्हणूनच जेव्हा नायला अली खान Kashmiriyat is a pototype for Hindustaniyat' असं म्हणतात ते सार्थ वाटतं. त्याचं सूत्ररूपानं कारण सांगताना त्यांनी म्हटलं आहे, 'Kashimir's deepest connection with Indian Nation is of course in the spiritual realm. Where else but in kashmir would you find Muslim prepared not so openly prehpas in the present milieu to claim their vedic and Buddist heritage through is unparalled rishi - sufi order anywhere is the world?
 त्यामुळे तेव्हा ‘रोजा’ सिनेमा पाहून मी दिलेली प्रतिक्रिया आज मला अतिरंजित व रोमँटिक वाटत नाही. माझ्या मते कश्मीरियत हे भारतीयतेशी नातं सांगणारे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे काश्मीर भारतापासून अलग राहू शकत नाही.
 पण फाळणीपासून काश्मीर ही एक न सुटलेली समस्या आहे हे ही खरंच.त्याची प्रमुख कारणं म्हणजे शेख अब्दुल्लांनी स्वतंत्र काश्मीर देशाचं पाहिलेलं स्वप्न आणि पाकिस्तानची नीती, की काश्मीर हा फाळणीचा राहिलेला उर्वरित कार्यक्रम आहे. त्याचा परिपाक म्हणजे राहिलेला आजचा काश्मीर प्रश्न होय.
 तो पाकिस्तानच्या बाजूनं सुटावा म्हणून पाकिस्तान एकाच वेळी अनेट आघाडीवर प्रयत्न करीत आहे. त्यातली एक आघाडी आहे काश्मीरियतवर प्रश्नचिन्हं लावणं व ती संपविण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी फाळणीप्रमाणे पुन्हा इस्लामचा सहारा घेत ऋषी - सूफी परंपरा नाकारणं, ती भारतीय बुद्धिवाद्यांनी गोंडस भाषेत रुजवायचा केलेला प्रयत्न आहे असे प्रतिपादन करीत त्या आडून त्यांना काश्मीर सोडायचा नाही अशी मांडणी करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. काश्मिरी मनात धर्माधतेचे जहर भरवण्यात भारताच्या काही चुकीच्या धोरणांमुळे त्यांना जन्याच प्रमाणात यश आलं आहे. त्यातून हुरियत कॉन्फरन्सखाली स्वतंत्र काश्मीरची मागणी करीत अंतिमतः हा भभाग पाकिस्तानला जोडणं ही पाकिस्तानची नीती ते अनुसरताना दिसतात.

 त्याचा खंबीर मुकाबला जसा राजनैतिक - सामाईक व आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या आधारे भारत करीत आहे; तसाच तो काश्मीरियेतच्या आधारे करताना दिसत नाही. त्यामुळे आज काश्मीरियतवर हे प्रश्नचिन्ह लावलं जातंय; हे तत्त्वज्ञान हा काही काश्मिरी पंडितांचा काल्पनाविलास आहे, असे गोबेल्स नीतीप्रमाणे रेटून सांगितलं

४१४ ■ लक्षदीप