या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे, त्याचा मुकाबला आपण करीत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
 काश्मीरियत तत्त्वज्ञानाला विरोध करीत ती नाकारणे, किंबहुना तिचं काश्मीर जनमानसातलं अस्तित्वच नाकारणे यासाठी जसे जहाल इस्लामी प्रयत्न करतात, तसंच काश्मीर खो-यातून विस्थापित झालेले कश्मिरी पंडितही करतात, ही दुहेरी शोकांतिका आहे.
 जहाल इस्लामवादी कश्मीरियत ही सेक्युलॅरिझम व राष्ट्रीयता या दोन तत्त्वज्ञानाचा मिलाफ आहे, असे प्रतिपादन करीत इस्लामला ते दोन्हीही मंजूर नाही असे प्रतिपादन करतात. तसंच सूफी तत्त्वज्ञानही नाकारायचा प्रयत्न करतात. पण साठ वर्षानंतरही बहुसंख्य काश्मिरी मुस्लिमांना पाकिस्तान आपला वाटत नाही, त्यांची भारताशी भावनिक नाळ जुडलेली आहे. शेख अब्दुल्लांच्या जमान्यापासून त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व व लोकप्रियतेमुळे त्यांच्या मनात स्वतंत्र काश्मीरचे स्वप्न रुजले होते; पण कश्यप मुनींपासूनची काश्मीरची हिंदू परंपरा, अशोक - कनिष्कामुळे रुजलेली बौद्ध परंपरा आणि लाल देड-नरुद्दिन यांची ऋषी-सूफी संत परंपरा या ऐतिहासिक सत्याकडे कसं दुर्लक्ष करता येईल? त्यामुळे काश्मिरियत ही हिंदुस्थानियत आहे हेच खरं!
 संपत प्रकाश हे जम्मू आणि काश्मीर ट्रेड युनियन सेंटरचे अध्यक्ष व कामगार नेते. ज्यांना सारा प्रदेश मानतो. त्यांनी कश्मीरियतच्या तत्त्वज्ञानापलीकडे जात काही विचार मांडले आहेत; ते व्यवहारी व पटण्याजोगे आहेत. त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत बिसमिल्ला गिलानी यांनी 'दि ह्युमन राईटस् जर्नल ऑफ जम्मू काश्मीर' साठी घेतली होती. त्यात त्यांनी जी मार्मिक निरीक्षणे नोंदवली आहेत, ती सारांश रूपाने खालीलप्रमाणे मांडता येतील.

 '१९४७ - ४८ साली पाकिस्तानी सैन्याचा मुकाबला करताना काश्मिरात एक लोकप्रिय घोषणा प्रत्येकाच्या ओठावर होती. 'हमलावर खबरदार, हम काश्मिरी है। तैयार, कदम कदम लड़ेंगे हम.' त्यामुळे माझ्या मते जेव्हा पंडित व मुस्लीम एकत्रितपणे पुढे येत बाह्य संकटाचा मुकाबला करायला सज्ज राहातात, तेव्हा त्यांची कृती व भावना काश्मीरियत अधोरेखित करते! काश्मीरचे पंडित व मुस्लीम यांची जीवनशैली कमालीची समान आहे. दोघांचे लग्नविधी, पेहराव, खाद्यसंस्कृती सारखीच आहे. त्यांची काश्मिरी भाषा के इतिहास समान आहे. भारतात जशी हिंदू व मुस्लीम वस्ती मोठ्या प्रमाणात अलग असते, तशी काश्मिरात स्थिती नाही. हिंदू पंडित व काश्मिरी मुस्लिमांच्या घराच्या भिंती व सफरचंदांचे केशराचे मळे एकमेकाला खेटून असतात. इथे काश्मिरात दर्गा, मस्जिद व मंदिरांना दोन्ही धर्मीय समानतेनं आदर देतात. त्यामुळे हरी पर्वताच्या माथ्यावर शारिका देवीचे मंदिर आहे, तर त्याच्या खाली मखदूम साहिबाचा दर्गा आहे. काली मंदिर व शाह हमदमची मजार एकमेकाला लागून आहे. बाटमोलाचा दग्र्याच्या उरुसात हिंदू व मुस्लीम दोघेही काही विशिष्ट काळात

लक्षदीय ■ ४१५