या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. लिंग असमानतेची विविध रुपे अर्थात लिंगभेदावर आधारित भारताची सामाजिक फाळणी नबिल पारितोषक विजेते प्रो. अमर्त्य सेन हे आपणास माहीत आहेत, ते त्यांच्या मानवी स्पर्श असलेल्या आणि सामाजिक परिमाण देणा-या अर्थशास्त्रीय संशोधन व लेखनासाठी. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातला बंगालचा विसाव्या शतकातला सर्वात भीषण दुष्काळ व झालेला मानवी मृत्यू हा केवळ अन्नधान्याची कमतरता यामुळे नसून तो मानवी क्रयशक्ती मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे उद्भवला होता, हे सप्रमाण संशोधनाने प्रसिद्ध केले आहे. प्रो. सेनचा भारतात अकॅडेमिक जगतापलिकडे फारसा ज्ञान नसलेला पैलू म्हणजे स्त्री • पुरुष म्हणजेच लिंग असमानता आणि त्याचे आर्थिक तसेच सामाजिक परिणाम याबाबतचा, ज्याला सार्थपणे प्रज्ञामयी म्हणता येईल, अशा मूलभूत व ज्यांचे निष्कर्ष अक्षरश: हादरवून सोडतील अशा मौलिक संशोधनाचा होय! अलीकडेच त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या रॅडक्लिक इन्स्टिट्यूट मध्ये Many face of gender inequality विषयावर जे अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले आणि हिंदु वृत्तपत्र गटाच्या फ्रंटलाईन पाक्षिकाने प्रो. सेनच्या या व्याख्यानाची पूर्ण संहिता आपल्या नोव्हेंबरच्या अंकात कव्हर स्टोरी म्हणून प्रसिद्ध केली, ती समस्त भारतीयांसाठी डोळे उघडविणारी, किंबहुना त्यांच्या नेत्रांत झणझणीत अंजन घालणारी ठरावी एवढी महत्त्वपूर्ण आहे. पुरोगामी व लिंग समानतेच्या क्षेत्रात काम करणा-या व भविष्यातील प्रगतीशील भारताची स्वप्नं पाहाणा-या विविध क्षेत्रातील नेते व कार्यकत्र्यासाठी या लेखाचा व अमर्त्य सेनच्या या विषयावरील एकूणच अभ्यासाचा डोळस मागोवा घेणे महत्त्वाचे ठरेल. ‘लिंगभेदाची अनेक रूपे' या विषयीचा त्यांच्या संशोधन व चिंतनाचा या व्याख्यानाच्या आधारे घेतलेला हा मागोवा. अमर्त्य सेन आपल्या या तयार केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाची सुरुवात एका रोचक संदर्भाने करतात. १८७० मध्ये राणी व्हिक्टोरियाने तक्रारीच्या सुरात म्हटलं होतं, This mad wicked folly of womens rights. पुढे ती उतारवयात असंही म्हणते, “आम्हाला पराभवाच्या शक्यतेच्या संदर्भात रस नाही. कारण ते अस्त्विातच ४१८ । लक्षदीप