या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शाळेत जाऊन शिक्षणाची संधी मुलांच्या तुलनेत फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सियांना त्यांच्या नैसर्गिक गुणसंवर्धन व अर्थपूर्ण सामाजिक मान्यताप्राप्त क्षेत्रात सहभागी होण्याची पुरेशी संधी मिळत नाही. हेही लिंग असमानतेचे एक विदारक स्वरूप आहे. ४. उच्च शिक्षणसंधीची असमानता जरी अनेक देशात पायाभूत प्राथमिक शिक्षण व आरोग्याबाबत फारशी लिंग- असमानता नसली तरी उच्च शिक्षणाच्या बाबतीत ती सार्वत्रिक आढळून येते. तेथे स्त्रियांची संख्या व टक्केवारी पुरुषांपेक्षा फार कमी आहे. हे युरोप व अमेरिकेतही दिसून येते, हे उल्लेखनीय आहे. याचं अगदी ठोकळेबाज रीतीनं कारणे देत समर्थन केलं जातं, म्हणजे स्त्री व पुरुषांची क्षेत्रं वा प्रांत ही वेगवेगळी आहेत. त्याला सर्वच देशात व काळात उघड वा छुपं समर्थन मिळताना दिसून येतं. १७६६ मध्ये रेव्हरंड जेम्स फोऽसि 'Sermons to young wormen' मध्ये स्त्रियांना इशारा देत तथाकथित पुरुषी वृत्तीच्या (पक्षी - स्त्रीवादी विचारसरणीच्या) स्त्रियांपासून त्यांनी सावध राहावं असं बजावलं होतं. कारण स्त्री व पुरुषांची कार्यक्षेत्रे भिन्न आहेत. केवळ पुरुषांची कार्यक्षेत्रं म्हणजे युद्ध आणि त्या जोडीला व्यापार, राजकारण, अमूर्त तत्त्वज्ञान आणि बोद्धिक व शारीरिक शक्ती असं रेव्हरंड जेम्सचं प्रतिपादन होतं. ते शास्त्रीय दृष्टीने किती अतार्किक व भ्रामक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नसली तरी आजही स्त्री व पुरुषांचे प्रांत वेगवेगळे म्हणून अनुभवास येणारी लिंग असमानता ठळकपणे विद्यमान आहे, हे नाकारता येणार नाही. ५. व्यावसायिक असमानता रोजगार आणि वरच्या जबाबदारींच्या पदावरील पदोन्नती वा नियुक्तीच्या संदर्भात स्त्रियांना पदोपदी पुरुषांच्या तुलनेत त्यांच्या प्राप्तीसाठी अविरत झगडावं लागतं. जपानसारख्या लिंग समानतेच्या इतर सर्व बाबत अग्रेसर असणा-या देशातही वरील पदोन्नतीच्या पदी स्त्रियांचं प्रमाण कमी दिसून येतं. ही व्यावसायिक असमानता हा लिग असमानतेचा एक वरच्या स्तराचा पैलू आहे. ६. मालकी हक्क असमानता (0wnership inequality) जगातील अनेक समाजात मालमत्तेच्या मालकीहक्काबाबत कमालीची असमानता दिसून येते. जमीन व घर या सारख्या मूलभूत गरजेच्या मालमत्तेच्याबाबत स्त्रीच्या वाट्यास नकारघंटाच आली आहे. त्यामुळे केवळ स्त्रीचा आवाजच दबला जात नाही, तर त्या अभावी ती आर्थिक, व्यापारी व सामाजिक क्षेत्रातही पुढे येऊ शकत नाही. ही असमानता जगात सर्वत्र आढळून येते. नियमाला अपवाद असतात, त्याप्रमाणे काही । ठळक अपवाद आहेत. उदा. केरळमधील नायर जमातीत मातृसत्ताक कुटुंबसंस्थेमध्ये मालमत्तेचा अधिकार स्त्रियांना पूर्वापार मिळत आलेला आहे. ४२० ॥ लक्षदीप