या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७. कौटुंबिक असमानता
 हा लिंग असमानतेचा सर्वात खोल रुजलेला व आजही फारसा कमी न झालेला पैलू आहे. ज्या समाजात, जेथे वरकरणी लिंग असमानतेचे एकही लक्षण (उदा. जन्मदरातला फरक, मुलाला अग्रक्रम वा प्राधान्य देणे, शिक्षण व व्यवसाय / नोकरी) दिसत नसलं तरी तेथेही कौटुंबिक असमानता स्पष्ट जाणवते. स्त्रियांनाच घरकाम व मुलांची निगा याबाबींचे ओझे वाहावे लागते. अनेक ठिकाणी स्त्रियांना बाहेर नोकरी करून दिली जाते, पण घरकाम चुकत नाही. यात प्रामुख्याने पुरुषांनी बाहेर काम करावे व स्त्रीनं घरी, अशी कामाची विषमतामूलक वाटणी दिसून येते. त्यामुळे कौटुंबिक संबंधात स्त्रीच्या वाट्यास असमानता व दुय्यमत्व येते आणि नोकरी व कामाच्या जागीही दुय्यमत्वाची कामं व वागणूक मिळते. त्यामुळे स्त्रियांना ज्ञान आणि बाह्य जगताच्या माहितीपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही.
 या कौटुंबिक असमानतेचा पगडा समाजपुरुषमनावर किती जबर आहे, याचे एक बोलकं उदाहरण प्रो. सेन यांनी या लेखात दिलं आहे. १९७० साली जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या प्रकाशित एका पुस्तिकेत उष्माकांची गरज या शीर्षकाखाली घरकाम करणाच्या स्त्रियांना कमी उष्मांक लागतात. कारण घरकामात शारीरिक हालचा अत्यंत कमी असतात, असे नमूद केलं आहे. ते किती हास्यास्पद आणि स्त्रावर पक्षपाती आहे, हे वेगळं सांगायला नको. याप्रमाणे लिंग असमानतेचे विविध प स्पष्ट करून प्रो. सेन यांनी असे प्रतिपादलं आहे की, लिंग असमानता निर्मूलन कोणत्याही एका ठोकळेबाज पद्धतीने करता येणार नाही. काळाच्या ओघात असा दिसून आलं आहे की, अनेक समाज व देशात एका प्रकारची लिंग असमानता कमी होऊन तिची जागा दुस-या प्रकारच्या असमानतेनं घेतली आहे. भारताच्या २००१ च्या जनगणनेची आकडेवारी काळजीपूर्वक पाहिली तर ही धक्कादायक बाब दिसून येते. लिंग असमातनेचा फटका स्त्री व मुलींसोबत पुरुष व मुलांनाही बसतो, हेही समजून घेतले पाहिजे. या असमानतेने पुरुषांसाठीही काही प्रश्न निर्माण केले आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विविध प्रकारची लिग असमानता ही दुस-या पद्धतीच्या लिंग असमानतेस खतपाणी घालतात. आणि प्रश्न आणि बिकट व गुंतागुंतीचा बनतो.

 वर नमूद केलेल्या विविध प्रकारच्या लिंग असमानतेपैकी जन्म व मृत्यू दरातील असमानता हा प्रो. सेन यांच्या चिंता व चिंतनाचा प्रमुख विषय आहे. आणि त्यांचा भर हा भारतीय उपखंडावर आहे. भारत, श्रीलंका, पाकिस्तान व बांगलादेश मध्य राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानाचे पद महिला नेत्यांनी भूषविले असूनही हे देश (श्रीलंका वगळून) मृत्यूदराच्या विषमतेच्या संदर्भात जगात सर्वाधिक खालच्या स्तरावर आहेत.

लक्षदीप ■ ४२१