या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पक्षपातानं जे दुर्लक्ष समाजात होते, ते अंतिमतः जन्म व आरोग्यावर घातक परिणाम करीत सर्वांनाच त्रस्त करतं. त्यातून पुरुषही सुटत नाही. नव्हे, स्त्रीपेक्षा पुरुषात हृदयरोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्त्रीकडे गुन्ह्यासारखं होत असलेल्या दुर्लक्षाचा बदला पुरुषांना किती तरी अधिक प्रमाणावर भोगावा लागत आहे.
 ही बाब कमी लेखणा-या समाजपुरुषाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. निसर्गाला लिंग असमानता मान्य नसून स्त्रीबाबत आहार व आरोग्य संदर्भात पक्षपात कराल, तर विपरीत परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील, असाच जणू निसर्ग इशारा देतो आहे.
 लिंग असमानतेच्या संदर्भातले लैकिक व नैसर्गिक सत्य रोखठोकपणे आपल्या लेखात मांडल्यानंतर प्रो. सेन त्यांच्या सामाजिक संदर्भाकडे वळत असं ठासून सांगतात की, स्त्रियांच्या अंगभूत सामथ्र्यांच्या विकासाला वाट मोकळी करून दिली, तर केवळ त्यांचा विकास व कल्याण होत नाही, तर एकूणच मनुष्यजमातीचा होतो. स्त्रियांच्या सर्वांगीण सक्षमीकरणामुळे स्त्री आणि पुरुष, मुले आणि मुली आणि एकूणच सर्वांच्याच जीवनात प्रगतीला चालना मिळते. अनेक शोधपाहण्यातून हे दिसून आले आहे की, स्त्रीला अधिकार प्रदान ज्या प्रमाणात दिले जाते, त्याप्रमाणात मुलांकडे होणारे दुर्लक्ष, बालमृत्यू आणि कुपोषण कमी होते. जोडप्याच्या जननदरात घट येऊन लोकसंख्या वाढीवर नियंत्रण येतं आणि एकूणच सामाजिक सुरक्षा आणि सांमजस्य वृद्धिंगत होते.
 स्त्रियांचा राजकीय व आर्थिक क्षेत्रातील सहभाग हा लिंगसमानतेसाठी साहाय्यक ठरतो. आर्थिक व व्यापारी क्षेत्रातही जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा पुरुषांच्या तुलनेत त्यांनी लक्षणीय यश मिळवल्याची अनेक उदाहरणे आहेत. प्रो. सेन बांगला देशातील ग्रामीण क्षेत्र आणि बांगला देश रूरल अडव्हान्समेंट कमिटी (आर. ए. सी.) चा खास उल्लेख करून तेथील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उच्चपदस्थ तसेच वाढत्या प्रमाणात सहभागी होणा-या कुटुंब नियोजन क्षेत्रातील मुस्लिम राष्ट्र असूनही प्रगती आश्चर्यकारक आहे. तेथील जननदर ही ६.१ वरून ३.० टक्क्यांवर आलेला आहे. तसेच भारतातही स्त्रीच्या सक्षमीकरणाच्या विविध उपाय योजनांमुळे स्त्रीची साक्षरता आणि तिचा आर्थिक व सामाजिक क्षेत्रात वाढता सहभाग दिसून येत आहे.

 वर नमूद केल्याप्रमाणे स्त्रियांबाबत सामाजिक व आर्थिक भेदभाव कमी होत चालला असला तरी, लिंग असमानतेच्या एका वाढत्या कटू सत्याकडे प्रो. सेन लक्ष वेधतात. ते आहे जन्मदर असमानतेचे, त्यासाठी त्यांनी भारताच्या ताज्या २००१ च्या जनगणनेचा प्राथमिक आकडेवारीचा आधार घेऊन जे निष्कर्ष भारताच्या संदर्भात काढले आहेत, ते अत्यंत विदारक व धक्कादायक तर आहेतच, पण देशाच्या एका नव्या अदृश्य फाळणीचे द्योतक आहेत ही चिंतेची व जागरूकतेनं विचार करण्याची

लक्षदीप ■ ४२५