या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी हाडाचा मानसशास्त्रज्ञ होतो खरा. त्यामुळे माणसाचं मन ही काय चीज आहे, हे काही अंशी तरी मी नक्कीच जाणत होतो.
 मनाचा चमत्कारिक असा हाही एक स्वभावधर्म आहे की, विसरू म्हटल्यानं एखादी गोष्ट विसरता येत नाही -
 जयाच्या प्रामाणिकतेबद्दल मी नि:शंक आहे. ती खरोखरच माझी होण्यासाठी मकरंदच्या तिच्या भावविश्वावर उमटलेला ठसा पुसण्याचा प्रयत्नही सर्व शिकस्तीनं करीत असणार... पण मनापुढे तीही हतबल असणार. विसरायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करता करता मकरंदचा ठसा, न जाणो कदाचित जास्त गडद व्हायचा संभव पण नाकारता येत नाही. ती स्वत: विषय कधी काढत नाही. मलाही बोलणं शक्य नाही. एक मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून हा तर्क करू शकतो....
 मला झालेल्या साक्षात्काराने मी घायाळ झालो होतो. स्वत:शीच मी ओल्या लाकडाप्रमाणे नि:शब्द जळत होतो. जयानं याचा अर्थ वेगळाच घेतला.
 'नरेश, अरे, मी बाळंतपणाला जातेय ती नाईलाजानं... मलाही तुला सोडून जावं वाटत नाही रे. तुझ्यासारखी मीही बेचैन आहे. राजा - विरहानं प्रेम वाढतं म्हणे! पाहू या, पुन्हा आपण जेव्हा असं सर्वस्वानं भेटू तेव्हा किती प्रेम वाढतंय ते...' तिचे मोठाले काळेभोर डोळे साकळले होते.
 "प्रेम किती वाढतं ते आत्ताच दिसतंय तुझ्या पोटाच्या आकारावरून", मी थट्टेने म्हणालो. “पुन्हा भेटू तेव्हा प्रेम बाहेर आलेलं असेल..."
 तिला मी हसवलं खरं, पण माझ्या मनावरचं सावट कमी झालं नव्हतं...
 एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी भावना विसरता येत नाही हे खरं असलं तरी त्यांच्यात बदल करता येतो असंही एक तत्त्व आहे मानसशास्त्राचं. या विषयाचं जर्नल वाचताना मनात एक भावना चमकून गेली.
 हे तत्त्व आपण जयाच्या मनाला लागू केलं तर?
 तिच्या मनात आजही मकरंदबद्दल काही भावना, सख्या-सहचराच्या-असतील तर त्या आपण नष्ट करू शकत नाही, त्यांच्यात परिवर्तन आणू शकतो....
 माझ्या एका लेखकमित्राची मला आठवण झाली. तो नेहमी म्हणायचा, ‘पत्नी ही थोडी आई पण असते नव-याची' जयासारखी पत्नी लाभल्यावर त्यातला सत्यांश जाणवतो. याचा अर्थ असा की, पतीकडे स्त्री मुलासारखी पाहू शकते ....
 आमच्या नवजात पुत्राने जेव्हा जीव धारण केला, तेव्हा जयाच्या मनात मी असेन - नसेन, कदाचित मकरंद असेल किंवा आम्ही दोघेही असू एकाच वेळी...

 मकरदेविषयांच्या ज्या काही अस्पष्ट - मधुर भावना जया जिवत असतील, त्या जर पुत्रभावनेत, वात्सल्य - उमाळ्यात परावनि तीही मुक्त होईल आपल्या भूतकाळापासून - जी आजही माझ्या मनात जिवंत

५६ ॥ लक्षदीप