हे पान प्रमाणित केलेले आहे.

रुपये?"

 मारवाड्याने दहाची एक नोट पुढे केली. नाइलाजाने ते पैसे खिशात टाकून तो तिथून निघाला. अनेक कटकटी त्याला मिटवायच्या होत्या...

 गारवा अंगाला झोंबू लागला तसा तो पुन्हा भानावर आला आणि सावरून बसला. मग त्याने कबरेत उडी घेतली. खाली वाकून त्याने दुल्हादीचे लाकडाचे ओंडके चाचपले. मग एकेक ओंडका त्याने सावकाश वर फेकला. सगळे ओंडके उचलताच कफनाचे सफेत वस्त्र त्या काळोखात त्याच्या दृष्टीस पडले.

 प्रेताशेजारी बसून रसूलने कफन सोडायला सुरुवात केली. प्रेताच्या मस्तकाजवळची दोरी बाजूला केली. मग खाली सरकून मधली आणि खालची हटवली. याचप्रमाणे त्याने गुंडाळलेले कफन अलगद दोन्ही बाजूंनी कडेला केले. एक मृत देह त्याला दिसू लागला. पायांपासून डोक्यापर्यंत त्याने आपली लुकलुकती नजर त्यावर फिरवली आणि डोक्यापाशी स्थिर केली. तो जवळ, डोक्याजवळ सरकला. कलते करून ठेवलेल्या तोंडावरून त्याने सहज हात फिरवला. प्रेताच्या तोंडावरून त्याचा हात फिरू लागला आणि कपाळावरून फिरत केसांवर गेला. त्याने हाताने केस चाचपून पाहिले. लांबसडक केस! स्त्रीचे केस! कोणा तरी स्त्रीचे ते प्रेत होते. कोण होती ही? कोणी कुंवार मुलगी? की एखादी जख्खड म्हातारी?

 धडपडत उठून तो कबरीच्या बाहेर आला आणि आणलेली मेणबत्ती आणि काड्याची पेटी त्याने घेतली. मग आत उतरून त्याने मेणबत्ती पेटवली आणि ती दुल्हादीच्या कडेवर ठेवली.

 मेणबत्तीच्या प्रकाशाने कबरीचा खड्डा उजळून निघाला. मातीची ढेकळे आणि पुंजके यांच्या मधोमध उताणा निजलेला स्त्रीदेह रसूल पाहू लागला. त्याच्या दिशेला कललेल्या तिच्या मुखाकडे त्याने टक लावली.

 सुमारे चौदा-पंधरा वर्षांची ती कोणी तरी एक मुलगी होती. ताज्या फुलासारखी ती टवटवीत होती. तिचे अवयव नुकतेच भरू लागलेले होते. मृत्यूचे चिन्ह तिच्या मुखावर दिसत नव्हते. जणू ती नुकतीच झोपली होती. झोपेतच जणू तिचे केस विस्कटले होते. तिचे डोळे किंचित उघडे राहिले होते. किलकिल्या डोळ्यांनी झोपेतच ती जणू रसूलला पाहत होती.

 तिच्या देहावरची वस्त्रे क्षणार्धात दूर करून रसूल तिचे अवयव नि अवयव निरखून पाहू लागला. तिचे गोरे गोरे तोंड आणि किलकिले डोळे, नाकाचा सरळ शेंडा आणि बारीक गळा, नुकतीच भरू लागलेली तिची छाती आणि मांसल पोटऱ्या! पायांची ताठ बोटे-एका कोवळ्या मुलीचा नग्न देह!

 त्याच्या साऱ्या शरीरातून एक शिणीक निघून गेली. कफन उचलायची त्याने घाई केली नाही. काही वेळ तो त्या स्त्रीदेहाकडे बघत राहिला, नुसता बघत राहिला. मग हलकेच आपल्या उजव्या हाताने त्याने तिच्या नाकाच्या शेंड्याला स्पर्श केला. तिच्या गार नाकाचा त्याच्या हाताला स्पर्श झाला. तिची कानशिले त्याने चाचपली. हात हलवून पाहिले आणि

कफनचोर । ११