हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यंगावर नेमके बोट ठेवायची कला त्याला चांगली अवगत झाली होती. तो कसला उद्योग करीत नव्हता. त्याच्यावर कसली जबाबदारी नव्हती. त्याचे दोन भाऊ मुंबईला नोकऱ्या करीत होते आणि लागेल तेवढा पैसा त्याला पाठवीत होते. त्या पैशावर तो मजा मारीत होता. सिगारेट ओढीत होता. गप्पा मारीत होता.
 आता त्याला दैववशात प्राप्त झालेल्या या सुखावर त्याने आपल्या मगजाने एक विनोदी कथा रचली होती.
 त्या कथेप्रमाणे त्याच्या संसाराच्या गाडीला दोन बैल जोडलेले होते. ते गाडी ओढीत होते आणि तो ती गाडी हाकीत होता. लगाम घट्ट धरून बसला होता आणि जोवर ते बैल ओढत होते तोवर त्याला काळजीचे काही कारण नव्हते. या कथेतले बैल म्हणजे त्याचे दोन भाऊ होते!
 स्वत:वर रचलेल्या त्याच्या या कथेचा सारांश त्याच्या भावांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर असा काही जबरदस्त प्रभाव पडला होता की, स्वत:च्या अपमानास्पद स्थानाची लाज वाटण्याऐवजी त्यांना उलट त्याच्या विनोदी वृत्तीचे कौतुक वाटले होते. तेही त्या विनोदावर खूष होऊन इतरांबरोबर हॅS हॅS करून हसले होते.
 आपल्या भावांना हे कळावे ही गोष्ट खुद्द दिलावरला मात्र तितकीशी रुचली नव्हती. त्यांच्या कानावर ती घालणाऱ्या लोकांवर त्याने यथेच्छ तोंडसुख घेतले होते. भावाभावांत बेबनाव करावयाची त्या लोकांची ही वृत्ती असल्याचा त्या लोकांवर त्याने आरोप केला होता. आणि या गोष्टीचे त्याने पुढे बरेच दिवस भांडवल केले होते. स्वत: केलेल्या विनोदाच्या कथनाने हा मनुष्य एवढा चिडावा याचे त्या लोकांना आश्चर्य वाटले होते. त्याचा त्यांना रागही आला होता. परंतु त्यांनी त्या गोष्टीला फारसे महत्त्व न द्यावयाचे ठरवले होते. नेहमीसारखे ते पुलावर जमत होते. आणि त्याच्या नवनव्या कथा रंगून जाऊन ऐकत होते.
 एके रात्री ते सारे असेच पुलापाशी जमले होते. ती काळोखी रात्र होती आणि पायाखालचा रस्तादेखील धड दिसत नव्हता. येताना कोणी टॉर्च घेऊन आला होता. कोणी काठी ठोकीत चालत आला होता. आपल्याला कुणी दिसले नाही तरी निदान समोरून येणाऱ्याला काठीचा आवाज ऐकू येईल असा त्यामागचा त्याचा हिशेब होता. आणि हाच हिशेब मनाशी करून कोणी विड्या फुकीत कुंकीत आले होते.
 परंतु सगळे आले तरी दिलावर मात्र आला नव्हता. आणि तो न आल्यामुळे तिथे गळा झालेल्या लोकांना गोळा झाल्यासारखे वाटत नव्हते. त्या महफिलचा प्राण आल्यासारखे त्यांना वाटत नव्हते. त्या पुलावर ते एकट्याने आणि अशा रीतीने बसून राहिले होते की, इतरांचे अस्तित्व त्यापैकी प्रत्येकाला जणू जाणवतच नव्हते. जणू पुलाच्या त्या कठड्यावर निष्प्राण पुतळेच बसून राहिले होते!

 अखेर बऱ्याच उशिराने दिलावर प्रकट झाला. त्याने चालण्यासाठी टॉर्चचा आधार घेतला नव्हता. काठीचा खडखडाट त्याला पसंत नव्हता. शिवाय त्यावेळी त्याच्या तोंडात पेटती

७० । लाट