हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुणीतरी मागून ढकलल्यासारखी कशीतरी त्याची पावले पडू लागली. थकलेले शरीर तो भराभर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू लागला. चालता चालता रस्त्यातून एक लग्नाची वरात जाताना त्याला दिसली म्हणून तो जागच्या जागी थांबला. वरातीमधून सावकाश जाणाऱ्या मोटारीमध्ये आपल्या सुनेला सजून बसलेली पाहताच दचकला! तिचे आपल्याकडे लक्ष वेधू नये म्हणून रस्त्यामधल्या गर्दीत मिसळला. डोळ्यांपुढे अंधारी आल्यासारखा एकटाच त्या गर्दीत उभा राहिला. काही वेळाने आपण एकटेच रस्त्यात उभे असल्याची त्याला जाणीव झाली. वरात गेली त्या दिशेने त्याने तोंड केले. मनातल्या मनात आपल्या सुनेला शुभ चिंतिले आणि मग ओझ्याने वाकल्यासारखा तो रखडत घराच्या दिशेने चालू लागला.

खुदा हाफिज । ९१