पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिमांत दी बुवायर यांनी मांडले आहे. स्त्रीवादी चळवळीच्या वैचारिक जडण घडणीत सिमांत दी बुवायर यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी त्यांची वैचारिक भूमिका 'दि सेकंड सेक्स' या पुस्तकातून खूप आधी मांडली.

• मायकेल श्ववेल्बी (Michael Schwalbe):- प्रत्येक व्यक्तीला योग्य (प्रॉपर) कसं जगावं हे शिकवावच लागतं, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीतला वर्तणूकीतला फरक आवश्यकच आहे. प्रत्येक व्यक्तीच स्वतंत्र अस्तित्व ओळखता आलं पाहिजे, त्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना त्याला पोहोचवता आल्या पाहिजे, त्याला/तिला पाहताक्षणी आपल्याला त्यांच वर्गीकरण करता आलं पाहिजे. यासाठी ही समाजात काहीतरी शिकवण्याची प्रक्रिया असणे आवश्यक आहे. त्या अर्थाने जेंडर ही प्रक्रिया घडते.

2004 मध्ये डेव्हीड हेग या विचारवंताने म्हंटल की, स्त्रीवादी चळवळीला माझी सहानुभूती आहे कारण हया कार्यकर्त्या शास्त्रींनी मला जीवशास्त्रीय लिंग बदलवण्यापेक्षा जेंडर निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली. जेंडर आणि आंबेडकरी चळवळ :- भारतात स्त्री वादी चळवळ 1975 पासून सुरू झाली असं मांडले जाते. पण अचानक 75च का? अशी अचानक सर्वांना एकदम भावना कशी काय निर्माण झाली. हे समजावून घेण्यासाठी त्या आधीच्या काही चळवळी समजावून घेतल्या पाहिजे. भारताच्या संदर्भात स्त्री वादी चळवळ समजावून घेण्यासाठी

त्याचे मुख्य सहा भाग करावे लागतील.

 १. अदिमकाळ ते षेतीचा षोध :- जेव्हा मनुष्यप्राणी गुहेत राहत होता. टोळीने राहून, अन्नाच्या शोधासाठी भटकंती सुरू होती तेव्हा मिळेल ते अन्न सेवन करून स्वतःला जिवंत ठेवायचे. त्यानंतर अग्नीचा शोध लागला. मांस भाजून, शिजवून खाल्लं पाहिजे, ही प्रक्रिया आहे हा शोध लागला. तेव्हा स्त्री तो अग्नी टिकवण्यासाठी एका

ठिकाणी म्हणजे आत्ताच्या भाषेत घरी राहू लागली आणि पुरूष शिकारी साठी बाहेर पडत राहिला. शिकार करणे आणि अग्नी टिकवणे हे दोन्हीही तितकेच महत्वाचे आणि समाजासाठीची सामूहिक कृती होती. त्यामुळे त्यात भेदभाव/इगो/राग लोभ नव्हते.

 स्त्री जेव्हा तेव्हाच्या काळात घरी होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की, आपण खाऊन जे बी उरतं ते जमिनीत पडल्यानंतर काही काळा नंतर जमिनीतून त्याच झाड तयार होतं तिच्या या निरिक्षणानंतर तिने ही प्रकिया जाणिवपूर्वक करून पाहिली आणि शेतीचा शोध लागला. हा शोध सर्वांसाठी उपयोगात आणून अन्नासाठीची भटकंती थांबून समूह स्थिर झाले. स्थिर समूहाने मग शेती करणे हाच मुख्य व्यवसाय केला. या शोधाच्या बरोबरच जसं पृथ्वी नविन जीव जन्माला घालते, तशीच स्त्री ही पुरूषा बरोबरच्या सहभागातून नविन जीव जन्माला घालू शकते. हया दोन्हीही प्रक्रिया आहेत. यासाठी दोन स्त्री पुरुषांच एकत्र येणे म्हणजे संयोग आवश्यक आहे. हे लक्षात आल्यानंतर मालकी हक्क तसेच पावित्र्य किंवा योनिशूचिता(म्हणजे एका स्त्रीचा आणि

लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१६


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१६