पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असेल त्याचे सर्टिफिकेट घ्यायला विसरू नका. त्या सर्टिफिकेट मध्ये झालेल्या जखमा हया कौटुंबिक हिंसाचारामुळे म्हणजे जी घटना घडली असेल, त्यामुळे झाल्या आहेत हे स्पष्ट होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मारलं त्यांची नाव येतील याकडे लक्ष दयायला हवे. तिथे

असलेले डॉक्टर त्यासाठी तयार नसतात, तेव्हा त्यांच्याबरोबर काम करणे आवश्यक असते.आम्ही फक्त मेडीकल सर्टिफिकेट देतो, बाकीच्या माहितीशी आमचा काहीही संबंध नाही असे दवाखान्यातले लोक सांगतात. अशा वेळेस त्यांच्याशी बोलून त्यांना तयार करायला हवे.

४. पटनांची नोंद करणे- ती स्त्री आपल्याकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे (पोलिस स्टेशन किंवा कोर्ट) अर्ज नोंदवायला तयार असेल तर त्या अर्जात शक्य असेल तर तिच्या अक्षरात, तिच्याच भाषेत हिंसाचाराच्या घटनांचा वृतांत जितका सविस्तर, नेमका लिहिता येईल तेवढा लिहिला जातो आहे ना याकडे लक्ष द्यायला हवे. त्या स्त्रीचे कुठेही अर्ज नोंदवण्याची इच्छा नसेल फक्त तुमच्याशी बोलण्यासाठी त्या आलेल्या असतील तरी त्यांना आपल्याकडे फक्त लिहून द्या, आम्ही काहीही कार्यवाही करणार नाही, पण पुढे तुम्हाला केस हिस्ट्रीसाठी या अर्जाचा उपयोग होईन' असे सांगून सविस्तर अर्ज लिहून ठेवला पाहिजे. त्यासाठीही त्या तयार नसतील तर त्यांना त्यांच्या डायरीत लिहून ठेवायला सांगा, माहेरच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना किंवा जवळच्यांना पत्राने कळवायला सांगा. त्या बाई त्यादिवशी आपल्याकडे येऊन गेल्या याची सविस्तर नोंद आपल्याकडे करणे आवश्यक आहे. काही संस्था, संघटनांनी त्यासाठी एक स्वतंत्र नोद वही/ रजिस्टर ठेवले आहे.

 कुठलाही जीवघेणा हिंसाचार अचानक होत नाही, त्याची सुरुवात कुठंतरी कुरबुरी मध्ये असतेच. त्यामुळेच किरकोळ वाटणा-या घटनांचीही नोंद असणे आवश्यक आहे. अशा सुरुवातीच्या घटनांची नोंद नसली की मग झालेली मारहाण ही पहिलीच घटना आहे असे मोजून सर्वजण एकदा त्याला माफ कर अस सुचवतात. त्यामुळे त्या स्त्रीचा हिंसाचार थांबू शकतो यावरचा विश्वास उडतो हिंसाचाराच्या घटना तेव्हाच्या तेव्हा लिहिल्यामुळे तपशिलांची नोंद होते, नाहीतर नंतर काही गोष्टी आठवतात काही आठवत नाही त्यामुळे माहितीत निर्माण झालेल्या गॅपचा फायदा हिंसाचार करणा-यांना होतो.

 हिंसाचाराच्या घटनेची नोंद दोन कारणांसाठी अत्यंत महत्वाची आहे. एक म्हणजे कायदेशिर दृष्टया केस हिस्ट्री म्हणून दुसरे कारण असे की, जेव्हा कुठलीही हिंसाचारग्रस्त व्यक्ती त्या घटनेचा वृतांत लिहिते तेव्हा तिच्या नेणिवेतल्या मेंदूला (uncontious mind) ती घटना लक्षात ठेवण्यासाठी विषेश प्रयत्न करावे लागतात. ती माहिती सांभाळण्यासाठी लागणारी शक्ती त्या मेंदूची वाचल्यामुळे ती उर्जा तो मेंदू नविन कल्पना तयार करण्यासाठी वापरू शकतो, ज्यामुळे त्या स्त्रीला हिंसाचारातून बाहेर पडण्याचा नविन मार्ग सापडल्यामुळे ती आनंदी बनते. हिंसाचाराची घटना जेव्हा ती स्त्री मनातच ठेवते तेव्हा त्या घटनेने तिचा सर्व मेंदू व्यापून जातो, त्यामुळे तिला ती घटना अत्यंत गंभीर, अशक्य - त्यावर उपायच निघू शकत नाही असे वाटायला लागते. त्या उलट जेव्हा ती


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३९