पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ मुंबईची जादा काँग्रेस (१३) मुबईची जादा काँग्रेस 48 ५७ माँटेग्यू चेम्सफर्ड रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून नेमस्त व होमरूलर यांच्यात पुनः वाद सुरू झाला. आणि त्यानी ऑक्टोबर महिन्यात मुंबईस आपली वेगळी परिषद भरविण्याचे ठरविले. इकडे जादा काँग्रेसची बैठकहि मुंबईस ता. २८ ऑगष्टपासून भरविण्याचे ठरले. अर्थात् आधी जादा काँग्रेस भरणार व मग नम- स्तांची परिषद भरणारं तेव्हा आधी जादा कॉंग्रेसला जावे की नाही हा प्रश्न त्याना येऊन पडला. प्रथम असे वाटले की सर्व नेमस्त पक्षचा पक्ष आता काँग्रेसच्या बाहेर पडतो. पण तसे झाले नाही. वास्तविक काँग्रेसमधून बाहेर पड- ण्याला त्याना इतक्यात काहीच कारण झाले नव्हते. पण पूर्वी शास्त्री व चिंता- मणी यासारखे जे लोक होमरूलचे समर्थन करीत होते त्यानीहि काँग्रेसला जावयाचे नाही असे ठरविले. ठरल्याप्रमाणे सभेला ता. २८ रोजी प्रारंभ व्हावयाचा. पण आदले दिवशी पं. मदनमोहन यानी आपण नेमस्त पक्षाशी तडजोड करून पाहणार आहो म्हणून एक दिवसाची मुदत द्यावी अशी विनंति केली. म्हणून पुष्कळसा विरोध असताहि स्वागतमंडळाने ती गोष्ट मान्य केली. पण दुसरा दिवस उजाडताच बाच्छा यानी वर्तमानपत्रातून असे प्रसिद्ध केले की 'पंडितजींना तडजोडीविषयी मी काहीच आश्वासन दिले नव्हते. ते तडजोडीची गोष्ट उगीच बोलतात. कॉंग्रेस पक्षाशी आमचे एकमत होणे अशक्य आहे. आणि आमची वेगळी परिषद भर- विण्याचा निश्चय कायम आहे.' तात्पर्य पंडितजी तोंडघशी पडले आणि हजारो प्रतिनिधीना एक दिवस विनाकारण ताटकळत बसावे लागले. सभेला प्रत्यक्ष सुरवात ता. २९ रोजी एक वाजता झाली. स्वागताध्यक्ष विठ्ठल- भाई पटेल हे होते. आता मात्र ते हळूहळू राष्ट्रीय पक्षाकडे झुकू लागले होते. त्यानी आपल्या भाषणात फटकून वागणाऱ्या नेमस्त लोकावर टीका केली. जादा सभेचे अध्यक्षस्थान बॅ. हसन इमाम याना देण्यात आले होते. त्यानीहि आपल्या भाष- णात असा उपदेश केला की लोकानी आपल्या मागण्या चर्चा करून ठरवाव्या आणि त्या जोराने व निश्चयाने मागत राहावे. दुसरे दिवशी सभेला ३ || वाजता सुरवात झाली. एका ठरावावर ब्रेझन्टबाईचे भाषण झाले. फिरून विषयनियामक कमिटी बसली ती त्या दिवशी व दुसरे दिवशी चालली. व शेवटी तिसरे दिवशी सुधारणांची योजना निश्चित ठरून तो ठराव पं० मदनमोहन यानी मांडला. लल्लूभाई सामळदास यानी आपल्या भाषणात सांगितले की काँग्रेसमध्ये नेम- स्ताना अपमानास्पद रीतीने वागविण्यात येईल अशी भीति वाटत होती पण तसे काही घडले नाही. पण विषय नि० मंडळाच्या सभेत व्यक्तिशः अनेक खटके उडाले ही गोष्ट खरी. सभेला मुंबईचे व पुण्याचे नेमस्त पक्षाचे काही काही लोक हजर राहिले होते. त्या सर्वातर्फेच ही कबूली होती. डॉ. रासबिहारी घोस यानीहि सभेला सहानुभूतीची तार पाठविली होती. एकंदर विचार करता राष्ट्रीय सभेने