पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ प्र० – ज्यावेळी हे काम तुम्ही अंगावर घेतलेत त्यावेळी टिळकांचे व तुमचे विचार जमत असतीलच? उ०-माझी मते मी स्वतः विचार करून ठरविलेली असत. सर्वसाधारण रीतीने माझे विचार त्यांच्याशी जुळत असत. प्र०—टिळकांच्या शिक्षेनंतर पत्राचे धोरण त्यांच्याप्रमाणेच तुम्ही ठेवले असेल? उ०-पत्राचे धोरण योग्य व इष्ट वाटले तसे मी ठेविले. मला योग्य वाटेल ते धोरण मी स्वीकारले. अमुकच धोरण ठेवा असे टिळकानी मला केव्हाच सांगितले नव्हते. यशवंत गणेश कुळकर्णी (टिळकांचे कारकून) यानी आपल्या साक्षीत सांगितले की नाशिकच्या खटल्यातील ब्रह्मगिरीबोवाना मी ओळखतो. प्र० – ब्रह्मगिरीयोवा हे टिळकांचे मित्र होते काय? (टिळकांच्या वकि लानी या सूचक प्रश्नाला हरकत घेतली. पण कोर्टाने त्याला परवानगी दिली.) उ० -नावाने ते टिळकाना माहीत होते व नुसत्या नावाची ओळखदेख अस- णाऱ्याला मित्र म्हणता येईल तर खुशाल म्हणा. अशी नावाची ओळखदेख असलेली टिळकांच्या माहितीची हजारो माणसे पुण्यात आहेत! टिळकांचे मुंबईसरकारचे सेक्रेटरी रॉबर्टसन यास पत्र पुणे २२-४-१९१७ चिरोल यांचे विरुद्ध मी लावलेल्या फिर्यादीत प्रतिवादीने कमिशन मागून घेतले आले व हिंदुस्थानातील साक्षीदार तपासण्याकरिता कमिशनचे काम मुंत्र- ईस चालणार आहे. मला खात्रीलायक बातमीवरून असे समजते की नाशिकच्या खटल्यात ज्या साक्षीदारानी साक्षी दिल्या त्यांच्यावर पुणे मुंबई व नाशिक येथील अधि- कारी अयोग्य वजन पाडून सदर साक्षीदाराना मथवण्याचा प्रयत्न करीत आहेत. खाजगी खटल्यात पोलिसने अशा तऱ्हेने लुडबुड करणे हे सर्वस्वी अयोग्य होय. म्हणून सरकारी अधिकान्यास असे करण्यास प्रतिबंध व्हावा. सरकार काही या खटल्यात पक्षकार नाही व सरकारी अधिकाऱ्यानी अशा रीतीने चिरोलला मदत केली तर तो सत्तेचा निवळ दुरुपयोग होईल. टिळकांचे रॉबर्टसन यास पस पुणे २४ मे १९१७ चिरोलच्या सॉलिसिटर्सनी सरकारची मदत खासगी तऱ्हेने का मागावी १ त्यानी न्यायकोर्टाच्या द्वारेच ती मिळविणे रास्त होय. ज्या कागदपत्राच्या नकला चिरोल यास दिल्या त्याच तुम्ही मला देणार पण तेवढ्यानेच माझे काम कसे होणार? वादाचे जे मुद्दे खटल्यात उपस्थित झाले आहेत त्याबद्दल जे कागदपत्र असतील त्या सर्वांची तपासणी करण्याची मला परवानगी मिळावी.