पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ टिळकांची उलट तपासणी ४५ प्र० - अलस्टरबद्दल तुम्ही बोलू नका. अलस्टर आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. असल्या व्यक्तिविषयक गोष्टी पुढे काढून तुम्हाला काही फायदा मिळेल असे वाटते काय? उ० – मी व्यक्तिविषयक बोलत नाही. पण जे लेख तुम्ही वाचले त्यात आयर्लंडचे नाव आहे म्हणून मी ते सांगितले. प्र० -अत्याचार म्हणजे काय? उ० – त्यात बाँवहि येतात इतर गोष्टीहि येतात. प्र० – निःशस्त्रप्रतिकारात बाँब येतात काय? उ० -नाही. प्र० – बंगाली लोकाना अराजक म्हटले खोटे काय? उ० – सर्व समाजा बद्दल लिहिले म्हणून ते तेवढे खोटे. प्र० - -चाँच फेकणे हा देशाभिमानाचा फक्त अतिरेक असेच तुमचे म्हणणे काय? उ० – नाही. प्र० – देशाभिमानाचा अतिरेक झाला की नाही हे कोण ठरविणार? उ०- राष्ट्र ठरवते. प्र० – बंगाली लोक अराजक नाहीत पण त्यानी फक्त अराजकांची साधने उपयोगात आणली इतकाच फरक असे तुम्ही लिहिले. पण त्यात फरक नाही काय? उ० – नाही. डार्लिंग – खरेच फरक नाही! म्हणजे सुरी तीच. तिने खाण्याचे पदार्थ. कापायचे की गळे कापायचे! इतकाच फरक की नाही? प्र० -जॅकसनचा खून करणारे लोक तरुण होते की प्रौढ होते? उ०—त्यांची वये मला माहित नाहीत. त्यातील एक पदवीधर होता. प्र० – ते सर्व तुमच्या जातीचेच होते की काय? उ० – मला माहीत नाही. काही असतील. प्र० - तुम्ही चित्पावन जातीचे पुढारी नाही काय? उ० -असलो तर निर- निराळ्या जातींचा असेन. एकट्या चित्पावनांचा नव्हे. प्र० – ते सगळे ब्राह्मणच नव्हते काय? उ०- -माहीत नाही. पण ब्राह्मणावर असा कटाक्ष रोखणे हे सडक्या मेंदूचे लक्षण होय! प्र० – पण हे शब्द न्या. दावर ह्यानी तुमच्याबद्दल वापरले आहेत? उ०- एखादा शब्द न्यायमूर्तींनी वापरला असला म्हणजे तो चूक असू नये की काय? सवड असती तर तेथेच योग्य उत्तर दिले असते. डार्लिंग–झाले. तीच गोष्ट १०० वेळा आली. आता हा मुद्दा पुरे झाला नाही काय? प्र० -इंग्रज हे मोंगलासारखेच आहेत असे तुम्ही लिहिले काय? उ०-होय. -मोंगल हे जुलमी राजे होते? उ० – होय. प्र० प्र० - ब्रिटिश राज्य म्हणजे सरकारच की नाही? उ०—- होय.