पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ चिरोल साहेबांची साक्ष प्र० – एकातहि केसरीचा उल्लेख नाही? उ०-नावाने नाही. प्र० – तर कशाने आहे? उ०मजकुरावरून आहे. ६७ प्र० - मग तुम्ही लिहिलेले शब्द बरोबर नाहीत? उ० – ते चूक नाहीत. प्र० - तुम्ही ह्या मुद्यावर पहिल्याने दिलेल्या कैफियतीत व दुसन्याने दिलेल्या कैफियतीत फरक आहे की नाही? उ० -नाही. प्र० – मग तांवड्या शाईचा काट कोठून आला? डार्लिंग—ते त्यांच्या वकिलाना माहित. प्र० - टिळक हजर असता चाफेकराने श्लोक म्हटले असे पुस्तकात लिहिले नाही काय? उ० – नाही. प्र० - पुस्तक लिहिताना चाफेकराचे दोन जवाब तुमच्यापुढे होते काय? तुमच्या पुढच्या व त्या जबावात श्लोक वगैरे म्हटल्याचा उल्लेख नाही? उ० नाही. प्र० - मग तो उतारा तुम्हाला कोठे मिळाला? उ० – ली वार्नर याजकडून मिळाला असेल? प्र० - चाफेकराने एक आत्मचरित्र लिहिलेले तुम्ही पाहिले होते काय? उ० - त्यातील थोडा भाग ली वार्नर यानी मला दिला होता. प्र०—मुंबई सरकारचे सेक्रेटरी रॉबर्टसन तुम्हाला या खटल्यात मदत करतात की नाही? उ० – नाही. दुसरे एक अधिकारी मदत करितात. -शेजारी असलेले माँटगामरी हेच काय? उ०- - होय. प्र० प्र० -सरकारकडून प्रतिवादीला मदत मिळावी वादीला मिळू नये हे योग्य आहे काय? उ० – नाही. प्र० – ली वार्नर यानी सरकारी कागदातील उतारे तुम्हाला दिले ते खाजगी रीतीने दिले? उ० – होय. प्र० – शिवाजी उत्सवाचा उपयोग टिळक राजकारणात करीत होते काय? -होय. उ० प्र० -मग अशा कार्याला सरकारने पाच हजार रुपये दिले? उ०- - शिवाजी ऐतिहासिक पुरूष म्हणून त्याच्या समाधीकरिता दिले. ते काही शिवाजी उत्सवाकरिता दिले नाहीत. प्र० -समाधी संरक्षणाची चळवळ व उत्सव ही तुम्ही वेगळी मानता काय? उ० - होय. प्र०-आणि अशा चळवळीतील समाधी संरक्षणाला सरकारने पाच हजार रुपये दिले? उ० – १९०७ साली दिले. प्र० - कोणीहि राजनिष्ठ मनुष्य टिळकांच्या या चळवळीत संबंध ठेवीत नव्हता काय? उ० कोणीही ठेवणार नाही.