पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ सर जॉन सायमन यांचा समारोप ८१ असते! प्रश्न इतकाच की असे करण्यात प्रामाणिकपणा होता की नाही? अधि- काऱ्यांनी टिळकावर फौजदारी खटले केले. त्यातून ते दोषमुक्त झाले. तरी 'तुम- च्यावर खटला झाला होता की नाही' असेच तुम्ही म्हणत राहणार की काय? पण चिरोल साहेबानी टिळकावद्दल अशा गोष्टी लिहिण्याचे कारण हेच की सार्वज निक दृष्ट्या टिळकाबद्दल त्यांच्या मनात विद्वेष उत्पन्न झाला होता. ह्या मुद्यावर प्रतिवादीला काहीच समर्थन करता आलेले नाही. म्हणून टिळकातर्फे तुम्हाला निकाल करावा लागेल. आणि तसे न केले तर काय परिणाम होईल पहा! चिरोल साहेब म्हणणार "मी टिळकांचे सार्वजनिक चरित्र इतके दूषणाई ठरविले की त्यांच्यासंबंधाने मी काय वाटेल ते खाजगी स्वरूपाचे लिहिले तरी ब्रिटिश ज्यूरीने माझ्यासारखा निकाल दिला!" पण ब्रिटिश ज्यूरीच्या शीलाला झोंबणारी अशी ही गोष्ट नाही काय? इतका वेळ पहिले चार मुद्दे झाले. यापुढे आता जॅकसन साहेबांच्या व रँडसा हेबांच्या खुनाचे मुद्दे एकत्र घेतो. वास्तविक एका खुनाशी कोणाचा संबंध जोडता आला तरी त्यामुळे दुसन्याहि एका चुनाशी त्यांचा संबंध पोचतो हे म्हणणे बेकायदे शीर ठरते. तथापि दोन्ही एकत्र घेण्यात मला हरकत वाटत नाही. कारण दोन्ही आरोपात काहीच तथ्य नाही. कारण चिरोलसाहेबानी जॅकसनच्या खुनासंबंधाने लिहिताना ती रँडच्या खुनाची आवृत्ति असे म्हटले आहे. रँडचुनासंबंधाने कार्सन- साहेबानी किती तोंड सोडले होते ते आपण पाहिलेच असेल. पण टिळकांचा एकंदर दर्जा, प्लेगसारख्या दिवसात त्यांनी केलेली लोकहिताची कामे, आणि त्याकरिता हायकोर्टानेहि शिक्षा देताना त्यांची केलेली वाखाणणी वगैरे गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या म्हणजे, त्यांच्या हातून रँड साहेबावर टीका झाली तरी तिचा खरा उद्देश काय होता हे लक्षात येईल. अशा कडक टीकेला कारणे किती सबळ होती हेहि लक्षात आणा. अशी कारणे दिसून आल्याशिवाय इंग्रज सिव्हिलिअन व सोजीर लोक यांच्यावर टिळकांनी केलेल्या टीकेचे समर्थन मी कसे करीन? लष्करी अधिकारी सुनशीपणाने वागत नव्हते. पण ज्याना प्लेग झालेला नाही अशा लोकाना सेग्रिगेशन कँपात नेणे हे त्यांचे कृत्य लोकाना कितपत आवडेल! आणि राग आला म्हणजे मनुष्य अतिशयोक्ति करीतच असतो. शिवाय अशा प्रकारच्या लेखात दोन प्रकारचा विचारप्रवाह असतो. एका दृष्टीने प्लेगच्या अधि- काऱ्यावर टीका करीत असता दुसऱ्या दृष्टीने प्लेग हटावा म्हणून योग्य उपायांची सक्ति आपण सोसली पाहिजे असाच लोकाना ते उपदेश करीत. चाफेकरांचे दोन जबाब पाहिले तर त्यात त्यांनी केव्हाहि टिळकांच्या नावाचा उल्लेखहि केला नाही किंवा केसरी मराठ्याचे नावहि घेतले नाही. असे असताना टिळकाना उद्देशून ह्या पुस्तकात कसे लिहिले आहे हे तुम्ही पाहिलेच असेल. (ह्या ठिकाणी चाफेकरांचे जबाब ज्यूरीला वाचून दाखविण्यात आले.) ह्या जबाबात काय काय