पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ३१ ७५ किंवा अधिक रक्कम येईल तर विकून टाका. त्या ७५ च्या भावाने घेतल्या आहेत तेव्हा निदान ७५ ला विकण्याला हरकत नाही. असे केल्याने भावे याना देण्याची व्याजाची रक्कम हलकी होईल. याखेरीज आणखी एक लक्ष रुपये जम- बावे लागतील. रौलेट विलाविरुद्ध तिकडे चाललेली तुमची चळवळ आम्ही इकडे नीट लक्षपूर्वक पहात आहोत. चिरोल केसचा निकाल आपल्याविरुद्ध झाला तथापि त्यामुळे आपले राजकारणातील आसन फारसे डळमळण्याची भीति नाही. म्हणून निकालाविरुद्ध अपील करण्याची कल्पना मी सोडून दिली आहे. (५७) टिळकांचे धोंडोपंतास पल लंडन २७ मार्च १९१९ गव्हर्मेंट प्रॉं. नोटा शेकडा ७५ किंवा वर भाव येत असल्यास ताबडतोच विकून टाकाव्या. अपील करण्यात आता अर्थ नाही असे ठरले आहे. ज्युबिली फंडाचे आपले सर्व पैसे गेले इतकेच नव्हे तर चिरोलचा खर्च देण्याकरिता त्यात आणखीहि भर घालावी लागेल. पैशाची तोंडमिळवणी करणे कठीण आहे. पण मी तिकडे आल्यावर काही तरी व्यवस्था करीन. तूर्त नोटा विकून कर्जाचा बोजा हलका केला पाहिजे. विनाकारण रकमेचे व्याज बाढू देण्यात तरी काय फायदा ? (५८) एडगर वॉलेस यांचे टिळकाना पत्र लंडन २ एप्रिल १९१९ तुमच्यासंबंधाने जे खरोखर येथील वर्तमानपत्रातून खुलासेवार लिहावयास पाहिजे ते कोणी लिहीत नाही. तुमच्याबद्दल इकडे कोणी लिहितील तर पक्षपाता- नेच लिहितील. काही तर तुमचे वैरी तुमच्या पक्षाचा द्वेष करणारे. पण तुमची खरी माहिती त्याना नाही. तुमचे खरे वर्णन लिहिले असते तर कोणी असे म्हटले असते की ' टिळक हे गृहस्थ अत्यंत सु-संस्कृत मनाचे आहेत. बोल्शेविझमचे ते कट्टे शत्रू आहेत. सर्व जगभर अंदाधुंदि सुरू असता स्वतःच्या देशाकरिता केवळ सनदशीर साधनानीच ते आज झगडत आहेत.' इकडे एखाद्या अँग्लो इंडियनला जर असे सांगितले की टिळकांच्या स्वराज्ययोजनेत शांतता कायदेकानू लष्करी व्यवस्था वरिष्ठ सरकारच्या हातीच रहावयाची आहेत आणि केवळ वसाहतीच्या पद्धतीचेच स्वराज्य ते मागत आहेत तर त्या गृहस्थाच्या तोंडाला फेस येतो! आणि आपण सांगतो ते खरेच आहे अशी त्याची खात्री पटविण्याकरिता आणखी पुढे युक्तिवाद करावयास जावे तर त्याला अपस्माराचा झटका येईल की काय अशी भीति वाटू लागते ! तात्पर्य खरी वस्तुस्थिति लोकापुढे मांडण्याला आज पुष्कळ वाव आहे पण साधने नाहीत.