पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ इंग्लंडातला एक संप १०३ खरी इच्छा लोकांची गैरसोय व्हावी ही नसून आपली मजुरी वाढावी इतकीच आहे. तात्पर्य दोघांचा कटाक्ष एकमेकावर नसून सरकारावरच आहे. सरकार व रेल्वे - नोकर यांची जंगी कुस्ती पाहण्याची लोकांस हौस आहे. पण पेहेलवानांची कुस्ती पाहताना आपल्या अंगावर त्यांची धुडे कोसळू नयेत किंवा त्यानी उडव- लेली माती पडू नये याविषयी प्रेक्षक जितकी खबरदारी घेतात तितकी खबरदारी येथील लोक घेत आहेत इतकेच काय ते. असो. लोकानी आपल्या केलेल्या सोयी- तजविजीमुळे शहरात खूप गडबड उडून राहिली असून नवीन देखावे दिसू लागले. रस्ते मोटारगाड्यानी फुलून गेले. श्रीमंतांच्या मोटारीतून पूर्वी एखाद- दुसरा मनुष्य तणावून बसलेला दिसावयाचा तेथे स्त्रीपुरुषांची खेच झाली. ठेवणीतल्या सर्व शोभिवंत चार-चाकी गाड्या व उमदे घोडे बाहेर निघाले असून दोहोंचाहि बैठा शीण लांब मजलानी निघून जाऊ लागला. सर्व हरप्रकारच्या वाहनातून निर्जीव मालाच्या जोडीला सजीव मालहि शीग लागेपर्यंत भरला गेला. बाहेरून लांबून येणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्यातून उत्तम उंची पोषाख केलेले लोकहि वागवानांच्या नोकरासारखे उंच बसलेले असे रोज सकाळी गावात येताना पाहून शहरचे लोक त्यांच्याकडे व ते लोकाकडे पाहून हसण्याची रेलचेल उडाली. भाड्याच्या मोटारी तर भिंगऱ्यासारख्या फिरत होत्या. साध्या बायसिकली लंड- नच्या रस्त्यानी पूर्वी कचित् दिसत. पण आता त्यांची अखंड रांग लागून राहिली. येवढेच नव्हे तर एकाने सायकल चालवावी व त्याच्या मागे दोघातिघानी एक- मेकांच्या अंगाखांद्यावर बसावे असे सर्कशीचे खेळ फुकट पहावयास सांपडू लागले ! पायाला पाय फुटल्याप्रमाणे हजारो स्त्रीपुरुष तुडतुडु चालताना दिसत. पायानी कोणी किती मजल मारली याविषयी चढाओढ सुरू माली. बाहेर प्रांतांत कित्येक लोकानी जरूरीच्या कामाकरिता पन्नास-पन्नास मैल प्रवास केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अखेर गाढवांच्या गाड्यातून वसण्या- पर्यंत पाळी आली ! एका विनोदी पत्रात चितारलेल्या गाढवाला वाचा फुटली असून ते म्हणते " बाबानो घाबरू नका. मी गाढव जिवंत असे तोंपर्यंत तुम्हाला काळजी नको ! बायबलातल्या एका शहाण्या गाढवाला' अशीच योग्य वेळी वाचा फुटली होती ! परिशिष्ट ५ इंग्लंडचे पुराणमतवादित्व इंग्रज लोक हे जितके प्रगमनशील तितकेच पुराणमतवादी आहेत. इकडे प्रगतीचे पाणी त्यांच्या हनुवटीपर्यंत येऊन भिडलेले असते व इकडे ते तोंडाने जुन्या गोष्टींचा पुरस्कार करीत असतात. केंब्रिज युनिव्हर्सिटीत बायका परीक्षा पास झाल्या तरी त्याना पदवी देत नाहीत. पण इकडे बायकाना मतदारीचा हक्क