पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ समारोप ५५ I have never advocated Boycott of Government. Pro- minent Nationalists have and are serving in Municipalities and Legislative Councils and I have fully supported their action both privately and publicly. " करणारे म्हणजे या तारांवरून टिळक " Boycott of Government सरकारला बहिष्कार घालणारे आहेत अशी गोखल्यांच्या पत्राने सब्जेक्ट कमिटीत व खुद्द विझांटवाईचीहि समजूत झालेली होती हे व्यक्त आहे. पण गोखल्यांच्या पत्राने बिझांटवाईची व भूपेंद्रबाबूचीहि अशी समजूत झाली ही गोष्ट ज्ञान- प्रकाशकारास कबूल करावयाची नसल्यामुळे त्यानी बिझांटवाईच्या तारेतील of Government (सरकारचा ) हे शब्द शिताफीने गाळून टाकून Boycott (बहिष्कार ) असा नुसता शब्दच कायम ठेविला आहे. वादाचा प्रश्न सरकारच्या बहिष्कारा- बद्दलचा आहे नुसत्या बहिष्काराबद्दलचा नव्हे हे लक्षात आणले म्हणजे of Governmont ( सरकारचा ) हे शब्द वगळण्यात गोखल्यांच्या शिष्यानी लुच्चे- गिरी नसली तरी अक्षम्य चुकी किंवा मूर्खपणा केला आहे असे दिसून येईल. तसेच टिळकानी विझांटबाईस जे उत्तर पाठविले ते प्रसिद्ध करताना Personally हे शब्द आपल्याच पदरचे घुसडले असून पुढील भाग म्हणजे राष्ट्रीय पक्षातील लोक म्युनिसिपालिट्या व कायदेकौन्सिलात कामे करीत होते व आहेत असा जो आपल्या म्हणण्याच्या दृढीकरणार्थ दाखवलेला पुरावा तोहि वगळलेला आहे. अर्धवट संभाषणातील तुटक शब्द सांगणे किंवा एकमेकामधील झालेल्या पत्र- व्यवहारातील किंवा तारातील महत्वाचे शब्द वगळून त्या प्रसिद्ध करणे या ग युक्त्या करण्यास जे मागेपुढे पाहात नाहीत त्यांच्या लेखावर किती विश्वास ठेवावा किंवा त्यांच्या म्हणण्यास किती मान द्यावा हे वाचकानीच ठरविले पाहिजे. समारोप सरतेशेवटी आमचे एवढे सांगणे आहे की हा वाद यापुढे अशा तन्हेने चालविण्यात काही अर्थ नाही. राष्ट्रीय पक्षातील लोकास मवाळांच्या काँग्रेस काँग्रेसांत घ्या अगर घेऊ नका पण त्यासाठी गुप्त लेखाचे किंवा कृत्याचे उपाय योजू नका किंवा राष्ट्रीय पक्षातील लोक जे उघड उघड बोलतात त्याचा विप- यस करून सरकारचा गैरसमज करू नका. गोखले काय आणि टिळक काय दोघांच्याही गोवऱ्या आता बहुतेक ओंकारेश्वरावर गेल्या आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. टिळक काँग्रेसमध्ये आले तर ती कबजात घेतील या म्हणण्यात काही हाशील नाही. काँग्रेस राष्ट्रीय आहे टिळकांची नव्हे किंवा गोखल्यांचीहि नव्हे. काँग्रेसचे धोरण काय असावे हे काँग्रेसने ठरवावयाचे आहे अमुक एका व्यक्तीने नाही. म्हणून काँग्रेसमधल्या प्रत्येक मनुष्यास आपली मते काँग्रेसपुढे ठेव- ण्याचा व त्यांच्या बहुमताने निर्णय करून घेण्याचा हक्क आहे आणि ही मते