पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक १३ राष्ट्रातील वाचकवृंदाने दिलेली आहे. त्यांचे लेखन अनलंकृत सौंदर्यांने मंडित असे येवढेच सामान्य वर्णन केले तरी ते समर्पक होईल. त्यात विशेष गुण म्हटले म्हणजे- विचारांचा ओष, शुद्ध पण त्याहूनहि अधिक कुशल अशी अनुमानपद्धति, ठसकेदार शब्द, इंग्रजी विचाराचे रूपांतर करणारे हिंदू संस्कृतीचे समर्पक शब्द, विशेषणाच्या जोड्या, स्फूर्तिदायक प्रश्न, उपहासाने लोळविणारे उद्गारयुक्त वाक्यांचे शेवट, अनुरूप अशी ठेवणीतील संस्कृत अवतरणे, नित्य व्यवहारातले दाखले, आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे निर्भयता व सावधगिरी यांचा सुंदर मेळ घालणारी स्पष्टोक्ति हे त्यांच्या लेखनातील विशेष गुण म्हणता येतील. त्यांची भाषापद्धति कदाचित् कोणाला प्रयत्नाने अनुसरिता येईल पण त्यांची विवेचनाची जोरदार शैली जवळ जवळ अननुकरणीय होय. टिळकांच्या वक्तृत्वासंबंधानेहि चालू पिढीला सांगण्याचे कारण नाही व पुढील पिढीकरता वर्णन देऊन ठेवावयाचे तर ते काम मात्र सोपे नाही. वास्तविक पाहता लेखनाप्रमाणे त्यांचे वक्तृत्वद्दि अनलंकृत- सौंदर्य - मंडित याच शब्दानी वर्णिले पाहिजे. खापर्डे यानी एकदा व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे टिळकांचा लेख वाचला म्हणजे ते समोर उभे राहून बोलत आहेत असे वाटावे, आणि त्यांचे व्याख्यान ऐकत असता ते छापण्याकरिता मजकूर सांग- तात की काय असे वाटावे. याचा अर्थ हाच की केवळ विषयसंगति, विचार- परिणति, प्रसादयुक्त व पटतील अशा व्यावहारिक शब्दानी मनोगत व्यक्त करणे, हाच टिळकांचे लेखन व वक्तृत्व यांचा आत्मा होता. याच्या उलट उदाहरण आगरकरांच्या लेखनकलेचे होय. आगरकराविषयी टिळक सांगत की केसरीचा लेख कंपाझिटरकडे देण्याच्या आधी म्हणजे बहुधा शनिवारी किंवा रविवारी संबंध दिवस खपून स्वस्थपणे सुवाच्य लिहिल्याशिवाय आगरकराना चैन पडत नसे व एक अग्रलेख लिहिण्याला ते दीड प्रहरहि घेत. आगरकरांची भाषा वाचताना फार मौज वाटते यात शंका नाही. पण त्यांच्या लिहिण्यात वाङ्मयाच्या अभिरुचीने केलेली कृत्रिम सजावट व बनावट बरीच असे ही गोष्ट त्यांच्या लेखातील शब्दावरूनच दिसून येते. पण टिळकाना भाषेवर शृंगार चढविण्याची हौस नसल्याने किल्ली देताच जसे यंत्र चालू होते तसेच टिळकानी एकदा लिहावयास सुरवात केली. म्हणजे ते कोणताहि लेख झपाट्याने लिहून टाकीत. आपल्या सहकारी संपादकाना ते नेहमी सांगत की "पुढच्या अग्रलेखाचा विषय माझ्या मनात आठ आठ दिवस घोळत असतो. " पण त्या घोळण्यामध्ये शब्दरचना कधीच येत नसली पाहिजे, तर विषयासंबंधाने ठरलेले मत घणाचे घाव घातल्याप्रमाणे त्यांच्या मनात विचा- रांच्या पुनरुक्तीने सुदृढ सकस बनत असले पाहिजे. व या विचाराचा घोटीव- पणा स्पष्ट निःशंक तेजस्वी प्रवृत्तिपर अशा शब्दानी त्यांच्या लेखातून प्रगट होई. दुसऱ्या एका पुढाऱ्याशी विरोध किंवा फरक दाखवावयाचा तर असे म्हणता येईल की गोखले यांचे लेखन किंवा वक्तृत्व रंधा मारून साफ केलेल्या लाकडाच्या पट्टी- प्रमाणे तुळतुळीत दिसें, तर टिळकांचा लेख किंवा व्याख्यान पाहिले असता ते