पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ लो० टिळकांचे चरित्र ८८ भाग २ बहाणा त्यांतील मायावी मुत्सद्यांनी सुरू केला होता. आणि कोणताहि मंत्र हा स्वतः तो जपणारावर उलटविता येतो यामुळे तीच भाषा सरकारविरुद्ध हिंदी लोक बोलू लागले तेव्हा ती त्याना निमूटपणे ऐकून घ्यावी लागली. किंबहुना हिंदी राष्ट्राच्या राजकीय आकांक्षेच्या पुराने वाहवून नासाडी करू नये म्हणून ती वाहण्याला बंदिस्त कालवा खणून त्यात तो पूर डांबून टाकण्याच्या उद्देशाने सरकारने आपण होऊन पुढान्याना म्हणण्यास सुरवात केली होती की, युद्धात हिंदुस्थानाने इंग्लंडला फार मदत केली तेव्हा आता जनतेला अधिक राजकीय हक्क देणे हे कृतज्ञबुद्धीला उचित असेच आहे. तर आता कोणकोणत्या सुधारणा हव्या त्यांचे टाचण कर- ण्याला सुरवात करा. वेळ दवडू नका. " दुसरे पक्षी लोकानाहि असे वाटे की "ही काही तरी मिळण्याची वेळ आहे. अशा वेळी स्वातंत्र्यादि राजकीय उपपत्ति व तात्विक हक वादाला पुढे काढण्यापेक्षा जराशी मोठीच का होईना पण विधायक व मूर्तस्वरूपाची मागणी करावी. " " तुमच्या राज्यात राहू इच्छितो म्हणूनच तर तुम्हाला युद्धात मदत केली. मग मागणी कितीहि मोठी मागितली तरी ती राज- ब्रोहात्मक होऊ शकत नाही हे निर्विवाद आहे" असे सरकाराला सहज म्हणता येण्यासारखे होते. आणि सरकारहि पेचांत सांपडले असून लोकाना खूप ठेवण्याच्या विचारात होते यामुळे बारीक सारीक शिव्याशाप किंवा चिमटे वक्त्यानी किंवा लेखकानी घेतले तर त्याकडे कानाडोळा करण्याकडे सरकाराचीहि प्रवृत्ति होती. होमरूलची तपशीलवार घटना वेगवेगळ्या प्रकाराची असली तरी होमरूलची मागणी राजद्रोहात्मक नव्हे हे निश्चित झाल्यावर, अत्याचाराविरुद्ध उघड उपदेश झाल्यावर, आणि युद्धात सरकारला मदत करू नका असे म्हणण्याऐवजी मदत करा असे उघड स्वार्थीपणाने म्हणत असता मी कितीहि आवेशयुक्त व निंदात्मक बोललो तरी ते यावेळी पचलेच पाहिजे अशी टिळकानी मनाशी गाठ घातली होती. बरे खटला झालाच तरी माझे वय आता साठ वर्षांचे झालेले तेव्हा शिक्षा झाली तरी सरकार काही काळ्या पाण्यावर पाठवीत नाही किंवा सक्तमजुरी देत नाही हे खास. मग दुबळ्या शरीराची व वार्धक्याची कीव करण्याकरिता आवे - शाला गवसणी घालण्याचे किंवा म्यान करण्याचे काय कारण असे टिळकानी मनाला विचारले असल्यास ते योग्यच होते. शिवाय केसरीची सांपत्तिक स्थिति १८९७ किंवा १९०८ या सालापेक्षा पुष्कळ बरी होती. तेव्हा खटला झाला तरी तो लढ- ण्याला हाताशी थोडेबहुत साधन होते. या सर्व विचारसरणीमुळे या चळवळीत बहुधा खटला होणारच नाही, आणि झालाच तर तो आपण जिंकू असा टिळ- कांचा भरवसा होता. पैकी त्यांचे पहिले अनुमान बाधित झाले. पण दुसरे अवा- धित ठरले. होमरूलच्या नव्या चळवळीचा पूर्ववृत्तांत मागे दिलाच आहे. १९१६ सालचा खटला हा चळवळीतला मध्यमेरू होय. तेव्हा त्याचा वृत्तांत कसा घडला हे आता पाहू. होमरूल लीग ऊर्फ स्वराज्यसंघ स्थापन झाल्यावर पहिले काम टिळकानी "