(९) प्राण जातसे या बेट्याचा । करी शरीरा मातेरें ॥ १ ॥ धर्माचारा मिळे गचांडी | मन मानेसा वांगे । जानव्यासि दे चाट समृळी । दाढी करि निज अंगें ॥ २ ॥ धोतर गळले पँन्टहि चढली । अर्धचंद्र दे मिशिला । फॅशन झाली नेकटायची । नंदिबैल हा सजला ॥ ३ ॥ घरांत नाहीं खाया बेट्या । चहावरी जिव काढी । परी सिनेमा यासि चुकेना । नाटक नच तो सोडी ।। ४ ।। स्वजन भेटतां नमस्कार तो । कधी तयासी न करी । गुडमॉर्निग्चा मारि तडाखा | हिंदि चालिचा वैरी ॥ ५ ॥ अप्टुडेट तो साहेब सजला | तोंडीं घाली चिरुट । रंग न जाई परी ढंग हे । परदेशीचा थाट ॥ ६ ॥ स्वजना वरती फिरवि खराटा । लाळ घोटि परक्यांची । चाहड्या चुगल्या करुनी भरतो। नीच खळगि पोटाची ॥७॥ नाहीं अक्कल करितो नक्कल । सदा इंग्रजी बोले । डौल दावितो निज कांतेला । पतिजी साहेब बनले ॥ ८ ॥ पैसा मिळण्या नवी युक्ति त्या । विलायती सांपडली । जाइ मंडपी रेस खेळण्या | द्रव्यराशि मावळली ॥ ९ ॥ पैसा गेला कजेहि झालें । दागिनेहि ते विकले । नाद न सोडी घरांदाराचे । जरी होय वाटोळें ॥ १० ॥ सदनिं स्त्रियानीं बंडाच केलें । दंड करा पुरुपाला |
पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/११
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही