पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

“लोकमान्य" ते होउनि गेले । त्यांचे म्हणविवि हे चले पोरासम ते हड्डा घरुनी । तंडत कां बसणार ॥ ११ ॥ जनता गेली भांबावोनी । मिथ्याचारी जन झाले । सकल शहाणे म्हणविती जगा । काय पुढे होणार ॥ १२ ॥ गणेश देवा देई प्रकाशा | "भास्कर" होई अज्ञानी । अंधकार हा विलया जावो । पुरवी मनिची आस ॥ १३ ॥ पड़ चवदावें चाल- हा नारायण अडला ) अहो हे ग्रॅजएट होती. केवळ पढत मूर्ख बनती ॥ध्रु.॥ एकदीड तप घालविलें तरि विद्या नाहीं पुरती ॥ ऐसी कांही इतिहासाची आपुल्या आहे ख्याती ॥ १ ॥ नोकरशाही तयार करण्या, शिक्षण खातें आलें ॥ गॅरंटीच्या जागा ठेउनि, हुपार नोकर केले ॥ २ ॥ विद्या येथिल ल्यास गेली, जर्मनींत ती नेलि म्हणे ॥ ऐकुनि ऐसे बाटे लोकां, प्रशस्त तिकडे जाणें ॥ ३ ॥ एक दोन का तीन कशाचे, सर्वचि धरती शाळा ॥ शिकलेले ते काय करिती, पहात नाहित डोळां ॥ ४ ॥ देशाची ही तरुण पिढीहो. येई शहरांमाजी ॥ नैतिक धार्मिक सामाजिक त्या. नीति बुडवी माजी ॥ ५॥ अभ्यासाच्या नांवावरती, वसतिग्रहा मधिं राही ॥ नियमभंग ते कितिक करोनी, "नाट्य सिनम" पाही॥६॥