( १३ ) नाट्य नाटक कादंवरि हा, यांचा असतो अभ्यास ॥ शिक्षक ऌीकां भेटुनि भेटुनि, होती किति तरि पास ॥७॥ संपत्तीची उधळपट्टही, ऐशी चालू आहे || आयुष्याचा शरिराचाही. नाश होतची राहे ॥ ८ ॥ पाश्चात्यांच्या राहाणीमध्यें, गोडी याला वाटे || आर्य संस्कृती त्याज्य मानुनी, स्वगृह तसे थाटे ॥ ९ ॥ सुधारणा का कुधारणा ही, काय म्हणावें याला ॥ सुधारणा या म्हणे दिसे हा, ग्रंथाच कोळुनि प्याला ॥१०॥ ‘जन्मवरी मी विद्यार्थी' हें, उत्तर दडपुनि देई ॥ संसाराची सोय पूसतां, सटीफिकिटें दावी ॥ ११ ॥ ग्रंथ तयाचे गहाळ होतां, कांहीं जवळीं नुरतें ॥ पाठांतर हें नांव काढितां, मस्तक याचें फिरतें ॥ १२ ॥ प्रतिवर्षी हे असेच किति तरि । घेती शिक्के नांवांचे ॥ व्यवहारामधिं बैल वाटती, अगढ़ी कुच कामाचे ॥ १३ ॥ अशा शिक्षणा भुलं नकाहो, शुद्ध मेंटरे तुम्हि व्हाल || आर्य संस्कृती जिवंत ठेवा, धन्य तुम्हीं मग व्हाल ॥ १४ ॥ , , ( पद पंधरावें चाल-सुनो सुनोजी मेरे यार ) हा खचित कठीण ये काल । भारता ! तुझ्या नशिवाला ॥ धृ ॥
पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/१५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही