पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

‘धर्माची चाड न उरली । ' वाडग्यांस वरकत आली गरिबांचा नुरला वाली । पैशांत मान हा भरला ॥ १ ॥ स्वहिताच्या प्राप्तीसाठीं । धर्माची थड्डा करिती । तिळही न कुणाची भीती । हम करे ' कायदा बनला ॥ २ ॥ वाग्पंडित सारे सजले । परि कार्य पूज्यची झालें । भांडणांत विसरूनी गेले । जन सगळे कर्तव्याला ॥ ३ ॥ उपदेशी गोष्टी सांगे। मनसोक्त स्वतः परि बागे । ना झजि तथा लव लागे । चड्ढा परि देशहिताला ॥ ४ ॥ बेगडी पुढारित्वाला | देशांत पूर जणुं आला । अपशकून परि दुसऱ्याला । बघ नाक कापुनी केला ॥ ५ ॥