पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५ ) निष्फळाचे मार्ग जो ठरला । घेउनी उराशी त्याला । मिळवितील कां सुयशाला । कधिंतरी हे ? जनहो बोला ॥ ६ ॥ तूं देई आतां जगदीशा । सद्बुद्धि पुढारी पुरुषा । तोडुनी त्वरित या पाशा । . करि स्वतंत्र भारतभूला ॥ ७ ॥ (सोळावे चाल- भांग असा उलटाचि० ) कां करुणा गजवदना येइ ना तुम्हांला । सत्वरीं दयाळा । तारि र अम्हांला । दास्यत्वें हैराणचि जीव प्रभो बहुत हा जहाला ॥ १० ॥ विघ्नहरा करुनि त्वरा । दास्याचें विघ्न हरा । तारोनी हिंदवरा | दावा हो सौख्यदिन आम्हांला ॥ १ ॥ परके कोठुनि आले । मालक होउनि बसले । सर्वस्वी नाडियलें । गजवदना हिंदी जनाला ॥ २ ॥ जगताचा तूं वाली । निष्ठुरता का असली ? । आम्हांतें दावियली । प्रभुराया आजचि या काला ॥३॥ समाप्त.